'माझा overconfidence मलाच नडला', बाईकवरुन पडल्यानंतर मिलिंद गवळींनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले 'म्हाताऱ्या आजीबाईला...'

 आता मिलिंद गवळी यांनी बाईक चालवण्याबद्दल आणि ओव्हर कॉन्फिडन्सबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 9, 2024, 03:37 PM IST
'माझा overconfidence मलाच नडला', बाईकवरुन पडल्यानंतर मिलिंद गवळींनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले 'म्हाताऱ्या आजीबाईला...' title=

Milind Gawali Bike Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारत आहेत. आता मिलिंद गवळी यांनी बाईक चालवण्याबद्दल आणि ओव्हर कॉन्फिडन्सबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळी ही सोशल मीडियावर सक्रीय असते. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते बाईक चालवताना दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी बाईक चालवणं आणि त्याचा सराव याबद्दल भाष्य केले आहे. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“सराव“ practice makes a man perfect. एखाद्या गोष्टीचं passion असणं खूपच चांगलं आहे , passion आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी achieve करण्यासाठी आवश्यकच असतं, तसंच confidence असणं, हि सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, confidence मुळे आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, ते करण्यासाठी आपल्याला एक प्रकारची energy, जिद्द आणि उत्साह मिळतो, पण overconfidence असणं, हे जरा घातक आहे. 

बर्याच वेळेला एखादी नवीन गोष्ट आपल्याला करायची असते आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि मग हळूहळू आपल्याला त्या गोष्टीची आवड निर्माण होते, ते करण्याचं passion आपल्यामध्ये येतं, मग ते करण्याचा आपल्यात एक सराव होतो, मग आपला confidence वाढतो, ती गोष्ट आपण सातत्याने confidently करू लागतो, आणि मग नकळत एक overconfidence आपल्यामध्ये यायला लागतो.

मला बालपणी सायकल चालवता येत नव्हती म्हणून सायकल चालवण्याचा मी सराव केला, सायकल चालवण्याचं passion निर्माण झालं, confidence वाढला आणि मग स्कूटर आणि मोटरसायकल चालवायला पण शिकलो, College मद्धे आठ वर्ष मोटर सायकल चालवली, आठ वर्षात एकदाच, एक म्हातार्या आजी अचानक समोर आली म्हणून पटकन ब्रेक दाबला आणि मोटरसायकल खाली पडली, म्हाताऱ्या आजीबाईला वाचवलं आणि मलाही काही लागलं नाही पण bike मात्र खाली पडली, त्यानंतर असंख्य वेळा सिनेमांमध्ये बाईक चालवली, stunts केले, मग चालत्या मोटरसायकल वरून हात सोडून लावण्याचा सराव पण केला, over confidence कधी अंगात घूसला काही कळलच नाही 

परवा दिगू बाबा आणि मिथिलाकडे गेलो असताना त्यांनी नवीन घेतलेली एनफिल्ड हिमालयन बाईक चालवायला घेतली, आणि टर्न sharp turn मारताना मला control करता च आला नाही, आणि बाईक खाली पडली , मी स्वतःला सावरलं पण मी बाईक सावरू शकलो नाही, नंतर 200 किलोची बाईक मला एकट्याला उचलता आली नाही, माझा overconfidence मलाच नडला, मी basics विसरलो होतो, तो म्हणजे “सराव”, कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय overconfident होऊ नये, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर एकाने लयभारी अशी कमेंट केली आहे. तर एकाने आपली फिटनेस खूप छान आहे, असे म्हटले आहे. तर एकाने तुम्ही ठिक आहात का, असा प्रश्न विचारला आहे.