Good News : आश्रम फेम अभिनेत्री बबिता अडकणार लग्नबंधनात

 'आश्रम' या वेबसिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री त्रिधा चौधरीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देऊन खळबळ माजवणारी बबिता जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

Updated: Nov 7, 2023, 12:38 PM IST
Good News : आश्रम फेम अभिनेत्री बबिता अडकणार लग्नबंधनात title=

मुंबई : 'आश्रम' या वेबसिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री त्रिधा चौधरीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देऊन खळबळ माजवणारी बबिता जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्वतः त्रिधाने याचा खुलासा केला आहे.

कलकत्ता टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्रिधाने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. त्रिधा चौधरीने सांगितलं की, ती पुढच्या वर्षी लग्न करणार आहे.  तिने तिच्या लग्नाची सर्व माहिती यावेळी सांगितली आहे.मात्र तिने अद्याप तिच्या भावी पतीचं नाव उघड केलेलं नाही. तिने नुकताच हाही खुलासा केला आहे की, तोही चित्रपटसृष्टीतील आहे.

लग्नाबद्दलचा आनंद व्यक्त करत त्रिधा म्हणाली की, आम्ही दोघंही सध्या खूप आनंदी आहोत आणि आम्हाला आमचं नातं खाजगी ठेवायला आवडतं.त्रिधा म्हणाली की, तिला लग्न साधेपणाने करायचं आहे. सर्व काही ठीक झालं तर पुढच्या वर्षी आम्ही लग्न करू, ती असंही म्हणाली, आमचं लग्न गुरुद्वारात होणार आहे.त्रिधा ही कलकत्त्याची रहिवासी आहे. तिचं वय 29 वर्षे आहे. ती लवकरच एका बंगाली सीरीजमध्ये दिसणार आहे.

आश्रम (Aashram) या बहूचर्चित वेबसीरीजमधून चर्चेत आलेली बबीता भाभी अर्थात त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) आश्रय (Aashram) या वेब सीरिजमध्ये 'बबिता' ही व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तसेच त्रिधा तिच्या ग्लॅमरस शैलीसाठीही ओळखली जाते. 

आश्रम (Aashram) या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनमध्ये त्रिधाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते. तिचे काम प्रेक्षकांनाच खूपच आवडलं होतं. आता आश्रमच्या तिसऱ्या सीझनमध्येही त्रिधा (Tridha Choudhury) दिसणार आहे, नव्या सीझनच्या ट्रेलरमध्ये त्रिधा पुन्हा त्याच जबरदस्त स्टाइलमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सीझनची उत्सुकता लागली आहे. 

आत्ता पर्यंत 'आश्रम' (Aashram Web Series)या वेब सिरीजचे तीन पार्ट रिलीज झाले आहेत. या तिनही पार्टला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या वेब सिरीजवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या सिरीजमध्ये एक पात्र होतं ते म्हणजे बबिता जे साकारलं एक्ट्रेस त्रिधा चौधरीने.