Tarak Mehta मालिका मध्येच सोडून गेलेला कलाकार पुन्हा करणार एन्ट्री?

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. 

Updated: Oct 15, 2022, 05:20 PM IST
Tarak Mehta मालिका मध्येच सोडून गेलेला कलाकार पुन्हा करणार एन्ट्री?  title=

Tarak Mehta Ka Ooltah Chasma Bhavya Gandhi: तारक मेहता या मालिकेबद्दल सध्या अनेक संभ्रम आहेत काही कलाकार हे शो सोडून जात आहेत तर काही कलाकार शोमध्ये परत येण्याच्या मार्गावर आहेत. दयाबेनचं पात्र साकारणारी अभिनेत्री दीशा वकानी ही अनेक वर्षे मालिकेपासून दूर आहे. त्यातून अनेक कलाकारही मध्यंतरी शो सोडून गेले आहेत. दयाबेन आणि हे कलाकार परत येणार की नाही यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. सध्या मालिकेच्या निर्मात्यांमध्ये आणि कलाकारांमध्येही एकमेकांबद्दल समज-गैरसमज आहेत. (actor bhavya gandhi may return to tarak mehta serial after a long gap)

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. या सगळ्या चर्चांमध्ये आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. सध्या माघारी गेलेल्या कलाकारांच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत तेव्हाच असाच एक मालिका सोडून गेलेला कलाकार पुन्हा एकदा शोमध्ये परत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा अभिनेता तारक मेहता या मालिकेत टप्पूची पुन्हा एकदा एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

या अभिनेत्याचं होणार पुनरागमन? 
भव्य गांधी याने तारक मेहतामध्ये छोट्या टप्पूची भूमिका साकारली होती. आता राज अनडकटने शो सोडल्याच्या बातम्या येत असताना भव्य गांधी शोमध्ये परतणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. या शोमध्ये फक्त भव्य गांधी छोट्या टप्पूच्या भूमिकेत दिसला होता. या पात्राला प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले होते. ही मालिका सोडल्यानंतर भव्य गुजराती चित्रपटसृष्टीत सक्रिय झाला. कोरोनाच्या काळात भव्यने आपल्या वडिलांनाही गमावले आहे. आता पुन्हा एकदा तो टप्पूच्या भूमिकेत परतणार असल्याची माहिती समोर येते आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

अभिनेत्यानं सोडली मालिका? 
अनेक वर्षांपासून राज अनडकट हा टप्पूच्या भूमिकेत दिसतो आहे. राजनंही ही मालिका सोडल्याचं समोर आलं होतं. असेही कळते की राज हा बॉलीवूडच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करतो आहे. लवकरच रणवीर सिंगसोबत एका प्रोजेक्टमध्ये तो दिसणार असल्याती चर्चा सुरू झाली आहे. नुकताच राज अनडकटचा एक म्युझिक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता.