Divorce नंतर नागा चैतन्यचा Ex Wife समंथावर निशाणा? पाहा तो नेमकं काय म्हणाला

घटस्फोटानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या

Updated: Dec 15, 2021, 11:53 AM IST
Divorce नंतर नागा चैतन्यचा Ex Wife समंथावर निशाणा? पाहा तो नेमकं काय म्हणाला  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मागील काही महिन्यांमध्ये दाक्षिणात्य कलाविश्वाला हादरवणारी बातमी होती, ती म्हणजे अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची. एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर अखेरस या दोघांनीह नात्याला कायमचा तडा गेल्याची बाब जाहीर केली. नागा चैतन्य आणि समंथानं जाहीर केलेली ही बाब चाहत्यांचं हृदय दुभंगणारी ठरली. 

घटस्फोटानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. ज्यानंतर या नात्यावर समंथानं काही मुलाखतींमध्ये संवेदनशील वक्तव्य केली. 

तिथे नागा चैतन्य यानं मात्र या सर्व प्रकरणावर मौन बाळगण्यालाच प्राधान्य दिलं. 

समंथाच्या प्रतिक्रिया ऐकून नागा चैतन्यच्या चाहत्यांनी तिच्यावर जोरदार निशाणाही साधला. ज्यानंतर आता नागाचे चाहते समंथाला टॅग करत त्याचा एक व्हिडीओ शेअर करत आहेत. 

व्हिडीओमध्ये नागा चैतन्य त्याच्या पसंतीच्या भूमिकांबाबत बोलताना दिसत आहे. 

'मी सर्व प्रकारच्या भूमिकांसाठीचा खेळ आहे. पण, त्या भूमिका माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या समाजातील स्थानावर, मानसन्मानार परिणाम करणाऱ्या नसाव्यात. 

मी अशा प्रकारच्या भूमिका स्वीकारणारच नाही जिथं माझ्या कुटुंबाती प्रतिष्ठा पणाला लागेल', असं तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. 

चाहते हाच व्हिडीओ समंथाला टॅग करत आहेत. त्याचं वक्तव्य हे तिलाच अनुसरुन असल्याचा दावा चाहते करत आहेत. ज्यामुळं आता नव्या चर्चांना वाव मिळत आहे.