फराह खानच्या शोमध्ये अनिल कपूरच्या वेषात दिसणारी ही कलाकार कोण?

प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान 'लिप सिंग बेटल' हा नवा टीव्ही शो घेऊन येणार आहे.

Updated: Sep 13, 2017, 05:43 PM IST
फराह खानच्या शोमध्ये अनिल कपूरच्या वेषात दिसणारी ही कलाकार कोण?

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान 'लिप सिंग बेटल' हा नवा टीव्ही शो घेऊन येणार आहे.

स्टार प्लसवर सुरू होणार्‍या या कार्यक्रमामध्ये फराह सोबत अली असगर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'लिप सिंग बेटल' या कार्यक्रमाच्या चित्रिकरणातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अनिल कपूरच्या गेटअपमध्ये एक खास कलाकार दिसत आहे. रविना टंडन आणि अनिल कपूरच्या गेटअपमध्ये असलेल्या कलाकारांचा खास फोटो फराहने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

 

स्टार प्लसवर लवकरच सुरू होणारा 'लिप सिंक बॅटल' हा शो एका अमेरिकन शोच्या थीमवर आधारित आहे. यामध्ये सेलिब्रिटींना पॉप्युलर बॉलिवूड गाण्यांवर लिप सिंक करावे लागते. ज्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल तो विजेता ठरतो. या शो मध्ये अली असगर स्त्री वेषात दिसणार आहे. या पात्राचे नाव कराह खान असेल. या शोमध्ये नकूल मेहता, सुरभी चंदा झळकणार आहेत. मनीष पॉल, मलाइका अरोरा, शबाना आजमी, परिणिती चोप्रा, करण जोहर आणि मिका सिंग  सहभागी होणार आहेत.