‘मुलगा हवा की मुलगी?’; करीना म्हणाली...

बेबो दुसऱ्यांदा आई होणार आहे.   

Updated: Nov 12, 2020, 07:06 PM IST
‘मुलगा हवा की मुलगी?’; करीना म्हणाली... title=

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खानने नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. तर दुसरीकडे ती एका नव्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडची बेबो दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावर रोज तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. खऱ्या आयुष्यात आणि सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तिच्या प्रत्येक घडामोडीकडे चाहत्यांची बारीक नजर असते. त्यामुळे तिच्या छोट्या गोष्टीचा देखील सोशल मीडियावर बोजवारा उडालेला असतो. सध्या करीना दिलेली एक मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे. ही मुलाखत २०१६ सालची आहे.

या मुलाखतीत बेबोला ‘मुलगा हवा की मुलगी?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना करीना म्हणाली, मुलगा असो किंवा मुलगी काय फरक पडतो. पण मला  मुलगीच झालेली जास्त आवडेल. मी माझ्या आई-वडिलांसाठी एका मुलाप्रमाणे आहे. असं करीना म्हणाली.

देशात मुली नको असणारे बरेच लोक आहेत, त्यांना उद्देशून करीना म्हणाली, फक्त एक स्त्रीच आहे जी जी दुसऱ्याला जन्म देते. करीना दुसऱ्यांदा आई होणार असल्यामुळे कपूर आणि खान कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

करीनाला पहिला मुलगा असून त्याचं नाव तैमुर आहे. सध्या लोकप्रिय स्टारकिड म्हणून तो प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत असतात.