'या' अभिनेत्रीने केला चक्क स्विमिंग पूलमध्येच रोमान्स, फोटो झाले व्हायरल

तिचा नवऱ्यासोबतचा स्विमिंग पूल रोमान्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Updated: Aug 6, 2022, 10:28 AM IST
'या' अभिनेत्रीने केला चक्क स्विमिंग पूलमध्येच रोमान्स, फोटो झाले व्हायरल title=

मुंबईः आजकाल सर्वच अभिनेत्री आपल्या नवऱ्यासोबत खुलेआपपणे रोमान्स करताना दिसतात. त्यात बीचवर, स्विमिंग पूलवरही आपले खाजगी फोटोज बॉलीवूड सेलिब्रेटी शेअर करताना दिसतात. नुकत्याच अशाच एका बॉलीवूड सेलिब्रेटीने आपल्या नवऱ्यासोबतचे स्विमिंग पूलमध्ये खाजगी फोटोज शेअर केले आहे जे प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा नवऱ्यासोबतचा स्विमिंग पूल रोमान्स पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

करिश्मा तन्ना तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. चाहतेही तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पुन्हा एकदा करिश्मा तन्नाने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी असेच काही रोमॅण्टिक फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये करिश्मा आपल्या पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये रोमान्स करताना दिसते आहे तसेच तिने पुलमध्ये बिकीनीमध्ये हॉट पोजही दिली आहे. 

स्विमिंग पूलमध्ये आपला पती वरूण बंगेरासोबत तिने पुलमधील त्यांचे खाजगी क्षण टिपले आहे. तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने नो मेकअप लुक केला आहे. करिश्मा आणि वरूण सनग्लासेस घातले आहेत. दोघंही बोल्ड अवतारात दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना करिश्माने कॅप्शनमध्ये '6' नंबर टाकला आहे. याचा अर्थ फारसा उमगला नसून तिने रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांनी तिच्या या लुकवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करिश्मा अॅमेझॉन प्राईमची वेब सीरिज 'गिल्टी माइंड्स' मध्ये दिसली होती. आता लवरकच ती नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे.