दोन मुलांची आई असूनही माझं शोषण झालं, अभिनेत्रीचा खुलासा

 पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मीशा सैफीने ट्विटरवर एक भलीमोठी पोस्ट लिहून अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप लावलाय.

Updated: Apr 21, 2018, 12:10 AM IST
 दोन मुलांची आई असूनही माझं शोषण झालं, अभिनेत्रीचा खुलासा title=

नवी दिल्ली : पाकिस्तानातही #METOO कॅंम्पेनबद्दल खुलासे होण्यास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मीशा सैफीने ट्विटरवर एक भलीमोठी पोस्ट लिहून अभिनेता अली जफरवर लैंगिक शोषणाचा आरोप लावलाय. तेरे बिन लादेन, डियर जिंदगी, किल दिल अशा सिनेमांमध्ये अली जफरने काम केलयं. मीशा सैफीनने 'भाग मिल्खा भाग'मध्ये छोटी भूमिका केलीए. 

ट्विटरवर लिहिली कहाणी 

मीशाने ट्विट करुन फिल्मी जगात अली जफरने लैंगिक संबध ठेवण्याची मागणी केल्याचे सांगते. दोन मुलांची आई झाल्यानंतर काळजावर दगड ठेवून लिहत असल्याचे ती म्हणते. आपण आपल्या मुलांना सांगतो की काही चुकीच होत असेल तर शांत बसू नका मग आई-वडिलांच्या नाते आपण शांत का बसायच ? असा प्रश्न तिने उपस्थित केलाय. मी दोन मुलांची आई असतानाही माझ्या पुरूष सहकार्यांनी माझ लैंगिक शोषण केल्याचे तिने सांगितले. 

अली जफर जाणार कोर्टात 

 अली जफरनेही त्याच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलय. त्याने सर्व आरोप फेटाळले आहेत. मी तिला कोर्टात खेचून याला आव्हान देणार असे त्याने म्हटले.  आपण एक मुलगा आणि मुलीचा बाप असून पारिवारिक व्यक्ति असल्याचे त्याने सांगितले.