'जिजा कोणाच्या प्रेमात पडेल तेव्हा...', आदिनाथ कोठारेनं लेकीच्या लव्ह लाइफविषयी केलं 'हे' वक्तव्य

Adinath Kothare Daughter Love: आदिनाथ कोठारेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी आदिनाथ कोठारेनं जिजाच्या भविष्यातील लव्ह लाईफवर तिला आणि ती ज्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असेल त्या मुलाला कोणता सल्ला देईल या प्रश्नावर वक्तव्य केलं आहे. 

Updated: Apr 24, 2023, 04:46 PM IST
'जिजा कोणाच्या प्रेमात पडेल तेव्हा...', आदिनाथ कोठारेनं लेकीच्या लव्ह लाइफविषयी केलं 'हे' वक्तव्य title=
(Photo Credit : Addinath M Kothare Instagram)

Adinath Kothare On Daughter Love: लोकप्रिय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) हे नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. पण त्या दोघांच्या जोडीसोबतच त्यांची लेक जिजा देखील नेहमीच चर्चेत असते. जिजा ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आदिनाथचं जिजासोबत एक खास नातं आहे. जसं एखाद्या वडिलांचं त्यांच्या मुलीसोबत असतं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदिनाथनं त्याचं आणि जिजाचं नातं कसं असावं याविषयी सांगितलं आहे. 

आदिनाथ कोठारेनं ‘प्लॅनेट मराठी’ ला ही मुलाखत दिली होती. यावेळी आदिनाथची ही खास मुलाखत होती. त्यानं पॉडकास्टसाठी ही मुलाखत दिली होती. यावेळी आदिनाथ जिजाविषयी अनेक गोष्टींवर बोलला. त्यात त्याचे वडील म्हणजेच जिजाचे आजोबा यांच्यात असलेले नाते, पत्नी आणि मुलगी याशिवाय चित्रपटसृष्टीवर देखील आदिनाथनं वक्तव्य केलं आहे. यावेळी आदिनाथला जिजाच्या लव्ह लाइफविषयी एक खास प्रश्न विचारण्यात आला होता. 'जिजा आता खूप लहान आहे, पण अजून 14 ते 15वर्षांनी जेव्हा ती मोठी होईल आणि कोणाच्या तरी प्रेमात पडेल, तेव्हा तिच्यासाठी काय मेसेज असेल आणि ज्या मुलाच्या प्रेमात असेल त्याच्यासाठी काय मेसेज असेल?' असा प्रश्न आदिनाथला विचारण्यात आला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रश्नावर आदिनाथ खूप सुंदर उत्तर देत म्हणाला, 'तू 14-15 वर्षही जास्त बोललीस. त्याच्या आधीच हे होणार आहे, असं मला वाटतं. पण बापरे मला खरंच माहिती नाही, तेव्हा काय होणार आहे. माझी इच्छा आहे किंवा माझं ते स्वप्न आहे की माझं आणि जिजाचं नातं हे फार वेगळं असावं. ती जेव्हा कधी कोणाच्या प्रेमात पडेल किंवा जेव्हा तिच्या आयुष्यात कोणी येईल, असं काही घडलं की तिनं सगळ्यात आधी येऊन कोणाला सांगावं तर ते मला सांगावं, अशी माझी इच्छा आहे. आमच्या दोघांचं नातं असं असावं अशी माझी इच्छा आहे.' 

हेही वाचा : काम मिळत नाही म्हणून वयाच्या 35 व्या वर्षी अभिनेत्यानं संपवलं आयुष्य

पुढे याविषयी बोलताना आदिनाथ म्हणाला, 'माझं आणि तिचं नातं तेव्हा मनमोकळं असावं, ही माझी इच्छा आहे. हा सल्ला मी तिला देण्यापेक्षा, हाच सल्ला मी मला स्वत: ला देईन. कारण या सगळ्या गोष्टी मी तेव्हा समजून घ्यायला हव्यात. मी एका मुलीचा बाप असलो तरी मला तिचा मित्र व्हायचं आहे.'

दरम्यान, जिजाचा जन्म हा 18 जानेवारी 2018 रोजी झाला. आदिनाथ, उर्मिला आणि महेश कोठारे हे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सतत जिजाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतता. इतक्या लहानवयात जिजाचे लाखो चाहते आहेत.