वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बालकलाकार करण जोहरच्या सिनेमात

2002 मध्ये बालकलाकार म्हणून केली भूमिका 

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला बालकलाकार करण जोहरच्या सिनेमात title=

मुंबई : 2002 मध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'एक छोटी सी लव्ह स्टोरी' या सिनेमातील हिरोची बालपणाची भूमिका साकारणारा अभिनेता आता करण जोहरच्या सिनेमात डेब्यू करत आहे. हा अभिनेता आहे आदित्य सील. आदित्यने मनीषा कोयरालासोबत किशोरवयातील प्रेम साकारल होतं. 

त्यानंतर आदित्य 2007 मधील सलाम इंडिया आणि 2014 मधील पुरानी जीन्स या सिनेमात दिसला. पण हे सिनेमे पार चालले नाहीत. त्यानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या 2016 मध्ये आलेल्या 'तुम बिन 2' या सिनेमात देखील आदित्य होता. पण लोकांच त्याच्याकडे लक्ष नाही गेलं. तसेच नमस्ते लंडनमध्ये देखील त्याने काम केलं आहे. 

पण आदित्य आता अशा सिनेमात काम करणार आहे ज्याकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द ईअर'या सिनेमाच मुख्य खलनायकाची भूमिका साकारत आहे. आदित्यला हा रोल ऑडिशन देऊन मिळाला आहे. त्यामुळे आता करण जोहरच्या सिनेमात काम केल्यामुळे आदित्यला ओळख मिळेल अशी आशा आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ देखील आहे.