तैमूरपाठोपाठ आता या स्टार किडचा फोटो होतोय Viral...

धर्मेंद्रसोबत काय आहे नातं?

तैमूरपाठोपाठ आता या स्टार किडचा फोटो होतोय Viral...  title=

मुंबई : सोशल मीडियावर तैमूरच्या फोटोंचे अनेक चाहते आहेत. तैमूरचा प्रत्येक लूक हा सोशल मीडियावर पसंतीला पडतो. असं असताना आता त्याला टक्कर द्यायला आणखी एक स्टार किड सज्ज झालं आहे. तैमूर, इयाना पाठोपाठ आता ईशा देओलची मुलगी सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहे.  गेल्या वर्षी ईशाने आपल्या गोंडस मुलीला जन्म दिला. आता ईशा देओल पुन्हा एकगा कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. ईशा आपल्यातील हा बदल स्विकारण्यासाठी आता जोमाने तयार झाली आहे. 

ईशा देओलने नुकताच आपली मुलगी राध्यासोबतच फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोतील क्यूट राध्याने सगळ्यांच लक्ष खेचून घेतलं आहे. एवढ्या लहान वयातच राध्याने कॅमेरासमोर पोझ देण्यास सुरूवात केली आहे. राध्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

 

Radhya Takhtani ... our darling daughter  @bharattakhtani3 #radhyatakhtani

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

ईशा देओलने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, राध्या तिची मुलगी ईशाला आपल्या बालपणीची ओळख करून देते. तसेच राध्याच्या खास गोष्टी शेअर करताना ईशा सांगते की, राध्या तोपर्यंत खुष असते जोपर्यंत तिच्यावर कोणतीही गोष्ट करण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. ती बऱ्याच प्रमाणात माझ्यासारखीच आहे. अनेकदा मला तिच्या देओल कुटुंबातील सगळे गुण दिसतात. ईशा आणि भरतने वर्ष 2010 मध्ये लग्न केलं आहे.