विराटच्या अपयशानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरली अनुष्का

मोठा निर्णय घेत अनुष्का अखेर सर्वांसमोर, पाहून व्हाल थक्क.... 

Updated: Jan 6, 2022, 05:59 PM IST
विराटच्या अपयशानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरली अनुष्का title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कर्णधारपदावरून निवड समितीकडून विराट कोहलीला दूर सारलं गेलं आणि क्रीडा रसिकांना धक्का बसला. अनेकांनीच यावेळी विराटच्या कामगिरीपासून ते अगदी त्याच्या सध्याच्या फॉर्मवरही प्रश्न उपस्थित केले. विराट मात्र मोठ्या सकारात्मकपणे मैदानात येतच राहिला. 

विराटमानोमाग आता त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा एक क्रिकेट खेळाडू म्हणून सर्वांसमोर आली आहे. (Anushka sharma)

हा अनुष्काचा सर्वात मोठा निर्णय असल्याचंही म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे भारतीय संघाची जर्सी घालत अनुष्कानं गाठलेली ही जागा अनेकांनाच थक्क करत आहे. 

सोशल मीडियावर यासंबंधीचे फोटोही व्हायरल होत आहेत. 

आता तुम्ही म्हणाल भारताच्या महिला क्रिकेट संघात अनुष्काला स्थान मिळालं, की काय? 

तर, तसं नाहीये. 3 वर्षांच्या मोठ्या कावालधीनंतर अनुष्का Chakda Xpress च्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर परतत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

इथं ती क्रिकेटपटू झूलन गोस्वामी हिच्या रुपात झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

झूलनच्या भाषेपासून ते तिच्या वावरण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अनुष्कानं आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमधून पाहता येत आहे. 

सोशल मीडियावर अनुष्काच्या या लूकला कमालीची पसंती मिळत आहे. पती भारतीय क्रिकेट संघात महत्त्वाच्या पदावर असतानाच अनुष्कानं निवडलेला हा मार्ग नक्कीच सर्वांची दाद मिळवणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.