#Metoo दोषी आणि आरोपी विषयी अजय देवगणचं लक्षवेधी वक्तव्य

'फिल्मफेअर'सह संवाद साधत असताना अजयने #Metoo मोहीमेवर वक्तव्य केले आहे. 

Updated: Jul 16, 2019, 04:23 PM IST
#Metoo दोषी आणि आरोपी विषयी अजय देवगणचं लक्षवेधी वक्तव्य title=

मुंबई : अमेरिकेत उदयास आलेली #Metoo मोहीम अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतात रूजवली. #Metoo हे वादळ अद्यापही शमलेले नाही. 'दे दे प्यार दे' चित्रपटात जेष्ठ अभिनेते अलोकनाथ यांनी भूमिका साकारली होती. त्यामुळे चाहत्यांची अभिनेता अजय देवगणवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती. 'दे दे प्यार दे' चित्रपटाचे चित्रीकरण विवादांच्या फार पूर्वी कल्याचे सांगण्यात आले होते. 'फिल्मफेअर'सह संवाद साधत असताना अजयने #Metoo मोहीमेवर वक्तव्य केले आहे. 

ज्या लोकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्या सोबत काम करणे योग्य आहे का? असा प्रश्न अजयला विचारण्यात आला. तेव्हा आरोपी आणि दोषी यांच्यातील फरक सांगत अजय म्हणाला की, 'आरोपी आणि दोषी सिद्ध होण्यात फार अंतर आहे. जे लोक दोषी म्हणून सिद्ध झाले आहेत त्यांच्यासह काम न करणे हे योग्य आहे, पण ज्यांच्यावर लागलेले आरोप सिद्ध झाले नाहीत, त्यांच्यावर आपण अन्याय करू शकत नाही. ' 

असे केल्यास त्यांच्या कुटुंबाचे काय? असा प्रश्न अजयने विचारला. गत वर्षी #Metoo मोहिमेने चांगलाच जोर धरला होता. त्यावेळेस अजयने या मोहिमेचे समर्थन केले होते. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाले आहेत, त्याच्या समर्थनार्थ 'अजय देवगन फिल्म्स' सदैव सोबत राहील. असे वक्तव्य अजय देवगणने केले.