मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ २५ टक्के मतदान?

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत मतदान केंद्रांवर कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.

Updated: Mar 5, 2018, 11:00 AM IST
मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ २५ टक्के मतदान? title=

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत मतदान केंद्रांवर कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.

मात्र काही मोजकेच चेहरे सोडले तर बहुतांश मतदारांनी मतदानासाठी फारसा उत्साहच दाखवला नाही. अंतिम मतदानाची टक्केवारी हाती आली तेव्हा मुंबईत सरासरी २३ ते २५ टक्के मतदान झाल्याचं चित्र पहायला मिळाल.  

या कलाकारांनी केले मतदान

माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर, गिरगावातील साहित्य संघ आणि बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह अशी मतदानासाठीची केंद्रं होती. अनेकांनी मतदानाकडे सपशेल पाठ फिरवली. तर महेश मांजरेकर, उषा नाडकर्णी, प्रशांत दामले, सतीश पुळेकर, विजय कदम, सिद्धार्थ जाधव, अरूण काकडे, विजय केंकरे इत्यादी नाट्य सिनेसृष्टीतील काहींनी मात्र मतदान केंद्रावर आवर्जून हजेरी लावली.

कधी लागणार निकाल?

मोहन जोशी गट आणि प्रसाद कांबळी गटामध्ये ही निवडणूक रंगली. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार काही चमत्कार घडवतायत का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणुकीचा निकाल ७ मार्चला जाहीर करण्यात येईल.