'आलिया कपूर म्हटलं तर चालेल का?', आलियानं दिलं असं उत्तर...

खुद्द आलिया आपल्या फॅन्सशी संवाद साधत असेल तर अशी संधी कोण सोडेल... 

Updated: Dec 14, 2018, 01:49 PM IST
'आलिया कपूर म्हटलं तर चालेल का?', आलियानं दिलं असं उत्तर...   title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं नातं काही लपून राहिलेलं नाही... या दोघांनीही अजून आपलं नातं उघडपणे मान्य केलेलं नसलं तरी कधी लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केलेला नाही. सध्या बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या लग्नाच्या सीझनमध्ये आलिया आणि रणबीर हे जोडपंदेखील आपला नंबर लावणार, अशा चर्चाही काही काळ रंगल्या... या दोघांचे फॅन्सही त्यांना एकत्र पाहून आनंदले... खुद्द आलियाच्या वडिलांनी अर्थात महेश भट्ट यांनी द टेलिग्राफशी बोलताना अप्रत्यक्षपणे त्यांच्या प्रेमावर मोहर उमटवली. 'आलिया आणि रणबीर प्रेमात आहेत, हे समजण्यासाठी तुम्हाला फार प्रतिभावान असण्याची गरज नाही' असं महेश भट्ट यांनी म्हटलं होतं. 

अशावेळी सोशल मीडियावर याची चर्चा झाली नाही तरच नवल... अशातच खुद्द आलिया आपल्या फॅन्सशी संवाद साधत असेल तर अशी संधी कोण सोडेल... 

आलियाच्या एका फॅननं ही संधी साधलीच आणि तिला लगेचच विचारूनही टाकलं की 'आम्ही तुम्हाला आलिया कपूर म्हटलं तर चालेल का?' 

या प्रश्नाचं आलियानंही अत्यंत खेळकर आणि खोडकर पद्धतीनं उत्तर दिलं... हिमांशू काकानी नावाच्या या फॅनला आलियानं उत्तर दिलं 'तुला मी हिमांशू भट्ट म्हटलं तर चालेल का?' अर्थातच हिमांशूला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं...

या वर्षी मे महिन्यात अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून ही जोडी दाखल झाली आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चांणा सुरुवात झाली होती.