आलिया भट्टच्या 'राझी' ची आतापर्यंतची कमाई

सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा 

आलिया भट्टच्या 'राझी' ची आतापर्यंतची कमाई title=

मुंबई : आलिया भट्ट स्टारर फिल्म 'राझी' सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या पॉलिटिकल थ्रिलर सिनेमाने वर्ल्ड वाइड 207 करोड रुपयांची कमाई केली आहे. करण जोहरने या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.  

ही 'वूमन ओरिएन्टेड' सिनेमा 11 मे रोजी रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतरही गेले 6 आठवडे राझी हा सिनेमा सिनेमागृहात आहे. मेघराज गुलझारने हरिंदर सिक्का याचं 'कॉलिंग सहमत' या पुस्तकाला खूप सुंदर रूपात सिनेमातून मांडल आहे.

 

A PROUD FILM!!! 207 crores WORLDWIDE @meghnagulzar @aliaabhatt @vickykaushal09

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

आलिया भट्टने या सिनेमांत 'कॉलिंग सहमत'ची भूमिका साकारली आहे. जी भारतीय इंटेलिजेंस एजन्सीने गु्प्तहेर तयार केली आहे. जिचं लग्न पाकिस्तानी ऑफिसरसोबत केली आहे. तसेच या सिनेमाचे लेखक हरिंदर सिक्का पेश्याने फौजी आहेत. सिनेमांच नाही तर राझी सिनेमांतील दिलबरो या गाण्याने देखील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. यूट्यूबवर आतापर्यंत 4.6 करोडहून अधिक लोकांनी गाणं पाहिलं आहे.