'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्यानं गाठले कोट्यवधींचे आकाडे; एकाच इंडस्ट्रीत असून सख्खा भाऊ मात्र करतोय संघर्ष

Allu Shirish Birthday: अल्लू अर्जून हा अभिनेता सध्या जगभरात फेमस आहे. त्याच्या चित्रपटांचीही सगळीकडेच क्रेझ आहे. त्यामुळे अल्लू अर्जून हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या भावाविषयी तुम्हाला माहितीये का, तोही गेली 10 वर्षे या क्षेत्रात सक्रिय आहे. आज त्याचा 36 वा वाढदिवस आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 30, 2023, 09:26 PM IST
'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्यानं गाठले कोट्यवधींचे आकाडे; एकाच इंडस्ट्रीत असून सख्खा भाऊ मात्र करतोय संघर्ष title=
May 30, 2023 | Allu Shirish Birthday अभिनेता अल्लू अर्जूनचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आज त्याच्या भावाचा अल्लू शिरीषचा 36 वा वाढदिवस आहे. (Photo: Bollywood Life)

Allu Shirish Birthday: दक्षिणेत सगळ्यात जास्त कोणाची क्रेझ असेल तर ती म्हणजे अल्लू अर्जूनची. 2021 साली आलेल्या त्याच्या पुष्पा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं इतकं गाजलं की काही विचारू नका. या गाण्याची जगभरात क्रेझ निर्माण झाली आहे. सामे या गाण्यानं तर इंटरनेटवर कहर केला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अल्लू अर्जूनची. परंतु अल्लूचा सख्खा भाऊ मात्र एकाच इंडस्ट्रीत असून स्ट्रगल करतो आहे.

अल्लू अर्जूनचा भाऊ अल्लू शिरीष (Allu Arjun Brother) हाही अगदी तिच्यासारखाच देखणा आहे. त्यांचा चेहराही हुबेहुब एकमेकांशी जुळतो. कोण अल्लू अर्जून आणि कोण अल्लू शिरीष हेही ओळखणं कठीण होऊन जाईल. (allu shirish birthday south indian movie superstar allu arjun brother struggles to be successful)

परंतु आता सर्वच चर्चा आहे ती म्हणजे अल्लू अर्जूनच्या भावाची. आज अल्लू शिरीषचा आज 36 वा वाढदिवस आहे. यावेळी आपल्या भावाला त्याच्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जूननंही खास शुभेच्छा दिल्या आहेत. अल्लू अर्जूनचा भाऊ अल्लू शिरीष हा गेल्या 10 वर्षांपासून या इंडस्ट्रीत सक्रिय आहे. परंतु अल्लू शिरीषला मात्र अद्यापही अल्लू अर्जून इतकी प्रसिद्धी मिळालेली नाही. दक्षिणेत अल्लू अर्जूनचं नावं हे प्रामुख्यानं घेतलं जातं परंतु त्याच्या सख्ख्या भावाबद्दल मात्र त्याच्या चाहत्यांना फार कमी माहिती असेल. अनेकांना माहितीही नसेल की अल्लू अर्जूनचा भाऊही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे व गेल्या एक दशकापासून तो चित्रपटसृष्टीत काम करतो आहे. 

यावेळी आपल्या भावाच्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जूननं इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं आपल्या भावाला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात अल्लू अर्जून म्हणतो की, माझ्या गोड भावाला त्याच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. त्यानं या पोस्टच्या खाली मिस यू असेही म्हटलं आहे याचा अर्थ अल्लू कुठेतरी शुटिंग करतोय अथवा अल्लूचा भाऊ अल्लू शिरीष कुठेतरी बाहेरगावी शुटिंग करतोय. त्यांच्या या फोटोची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्यावर कौतुकचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

allu shirish birthday south indian movie superstar allu arjun brother struggles to be successful

हेही वाचा - Jennifer Winget Birthday: करण सिंग ग्रोवरच्या पहिल्या पत्नीनं म्हणून दिला होता घटस्फोट, खरं कारण आलं समोर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या अल्लू शिरीष एक नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे ज्याची माहिती खुद्द अल्लू अर्जूननं इन्टाग्रामवरून दिली आहे. अल्लू शिरीषनं आत्तापर्यंत 7 मोठे बिग बजेट चित्रपट केले आहेत, परंतु त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही.