Jennifer Winget Birthday: करण सिंग ग्रोवरच्या पहिल्या पत्नीनं म्हणून दिला होता घटस्फोट, खरं कारण आलं समोर

Jennifer Winget on Divorse with Karan Singh Grover: बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री येऊन गेले ज्यांचे नाते फार काळ टिकले नाही. परंतु त्यांच्या रिलेशनशिपवरती आजही चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसते. अशाच एका एक्सकपलची सध्या चर्चा आहे आणि ते कपल म्हणजे करण सिंग ग्रोवर आणि जेनिफर विंगेट. 

गायत्री हसबनीस | Updated: May 30, 2023, 08:35 PM IST
Jennifer Winget Birthday: करण सिंग ग्रोवरच्या पहिल्या पत्नीनं म्हणून दिला होता घटस्फोट, खरं कारण आलं समोर title=
May 30, 2023 | Jennifer Winget and Karan Singh Grover बॉलिवूडच्या सेलिब्रेटींच्या बेक्रअपची अनेकदा चर्चा होताना दिसते. आज अभिनेत्री जेनिफर विंगेट हिचा वाढदिवस आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीतून आपल्या घटस्फोटावर भाष्य केले आहे. (Photo: India.com)

Jennifer Winget on Divorse with Karan Singh Grover: बॉलिवूडमध्ये अनेकदा ब्रेकअप्स होतात आणि ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यांवरही अनेकदा राहतो. बॉलिवूडची अशी अनेक ब्रेकअप्स गाजली आहेत. अशी गाजलेले ब्रेकअप्स ही काही फक्त बॉलिवूडपुरतीच मर्यादित नाहीत. तर टेलिव्हिजन क्षेत्रातही अशी अनेक गाजलेली सेलिब्रेटींची ब्रेकअप स्टोरीज आहेत. सध्या यातलच एक नाव म्हणजे करण सिंग ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेट यांचे. यांच्या ब्रेकअपचीही (Bollywood Breakups) चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे आजही त्यांची चर्चा होताना दिसते. टेलिव्हिजन क्षेत्रात त्यावेळी जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोवर यांच्या रिलेशनशिपची अनेकदा चर्चा रंगली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल आजही बोलले जाते. आज ते दोघंही आपापल्या क्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात पुढे गेलेले आहेत. 

जेनिफर आणि करण सिंग ग्रोवर यांनी 2012 साली लग्न केले होते. परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही त्यांनी 2014 साली घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून ते दूर झाले. त्यांची जवळीक त्याकाळी गाजलेली मालिका 'दिल मिल गये'मधून वाढली होती. त्यामुळे त्यावेळी ही सिरियल आवडीनं पाहणारी तरूणाई त्यांच्या या केमेस्ट्रीवरही प्रचंड फिदा होती. परंतु आता ते दोघं वेगळे झाले असले तरीसुद्धा त्यांच्याबद्दल त्यांचे चाहते आजही बोलताना दिसतात. परंतु आपल्या तुटलेल्या नात्यावर खुद्द जेनिफर विंगेटनचं खुलासा केला आहे. 

जेनिफरनं आपल्या बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीतून (Jennifer Winget Interview) यावर खुलासा केला आहे ती म्हणाली की, ''घटस्फोटासाठी आम्ही दोघं तयार नव्हता यावर मला खात्री होती. यात फक्त तो (करण सिंग ग्रोवर) किंवा मी नव्हते. आम्ही दोघंही इतकं मोठं पाऊल उचलायला तयार नव्हतो. आम्ही फार दीर्घ काळासाठी मित्र होतो. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा घरी नुसता धुमाकूळ घालायचो. पण मला वाटतं की हा आमच्यासाठी एक वाईट काळ होता.''

हेही वाचा - लाडक्या लेकीसाठी बिपाशानं घेतली आलिशान ऑडी! किंमत वाचून डोकं गरगरायला लागेल

करण सिंग ग्रोवरनं बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याशी 2016 मध्ये लग्न केले. त्यांना मागच्या वर्षी देवी नावाची एक गोड मुलगीही झाली आहे. जेनिफर ही वयाच्या 12 व्या वर्षापासून या क्षेत्रात सक्रिय आहे. पुर्वी तिचे केस मोठे होते आणि लहानपणी ती डोळ्याला चष्मा लावायची. तिनं ऐश्वर्या रॉय बच्चनसोबतही स्क्रिन शेअर केली आहे. जेनिफरनं अनेक लोकप्रिय मालिकांतून काम केली आहेत. जेनिफर इन्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय असते.