नव्याला शुभेच्छा देताना मामा अभिषेक झाला भावूक...

बीग बी अमिताभ बच्चन यांची नव्या नवेली आज २० वर्षांची झाली.

Updated: Dec 6, 2017, 10:52 PM IST
नव्याला शुभेच्छा देताना मामा अभिषेक झाला भावूक...  title=

मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांची नव्या नवेली आज २० वर्षांची झाली.

बीग बी यांची मुलगी श्वेता नंदा आणि बिझनेसमन निखिल नंदा यांची ही मुलगी... नव्या नवेलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिचा मामा म्हणजेच अभिषेक बच्चन जरा भावूकच झाला.

'तू केव्हा इतकी मोठी झालीस, जेवढी तू आज आहेस... कधीतरी मामा तुला घ्यायला विमानतळावर यायचा पण आज तूच मामाला घ्यायला येतेस. कधी तू इतकी मोठी झाली की मामा तुझ्यासाठी गाणं गायचा आणइ आता तू मामासोबत संपूर्ण रात्रभर डान्स करतेस. कधी तू इतकी मोठी झालीस की मामा तुझ्यासाठी शॉपिंग करत होता आणि आता तूच मामाची ऑफिशिअल शॉपर बनलीस. कधी तू इतकी मोठी झाली की तूच ठरवतेस मामा आता मी तितकी छोटी राहिले नाही. माझ्या लाडक्या, माझ्या भाचीसाठी, माझ्या नव्यासाठी...' असं म्हणत अभिषेकनं आपल्या भावना व्यक्त केल्यात. 

नुकतीच नव्या आपली आई श्वेता नंदा आणि आजी जया बच्चनसोबत वोग इंडिया मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसली.