अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

अमिताभ बच्चन यांची लेटेस्ट कोरोना चाचणी निगेटिव्ह...

Updated: Aug 2, 2020, 05:25 PM IST
अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज title=
संग्रहित फोटो

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची लेटेस्ट कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बिग बी कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

अभिषेक बच्चनने, बिग बींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज दिल्याचं ट्विट करुन सांगितलं आहे. तसंच या कठीण काळात बिग बींसाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे अभिषेकने आभारही मानले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करत, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं सांगत, सर्वांचे आभार मानले आहेत.