बिग बींची कार OLXवर विक्रीला; काय आहे किंमत

अमिताभ बच्चन यांना लग्जरी गाड्यांची आवड आहे. 

Updated: Jun 13, 2019, 06:27 PM IST
बिग बींची कार OLXवर विक्रीला; काय आहे किंमत  title=

मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांना लग्जरी गाड्यांची आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सध्या ओएलएक्सवर कार विकण्याची जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ज्यात बिग बींची मर्सिडीज दिसत आहे. या पोस्टमध्ये कारची किंमत ९.९ लाख रुपये इतकी देण्यात आली आहे. बिग बींच्या मर्सिडीजचं हे मॉडेल २००७ मधील आहे. 

बिग बींचा चाहता नक्कीच या गाडीची खरेदी करु शकतो. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंज वी क्लासचाही समावेश केला आहे. 

OLX वर पोस्ट करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे की, गाडी आपल्या तिसऱ्या मालकाकडे (थर्ड ओनर) आहे. गाडीने आतापर्यंत ५० हजार मैल प्रवास केलेला आहे. गाडीची किंमत ९ लाख ९९ हजार इतकी आहे. गाडीचं लोकेशन वांद्रे पश्चिम मुंबई असं देण्यात आलं आहे.

Amitabh bachchan selling his mercedes

अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक लग्जरी गाड्या आहेत. ज्यात Lexus LX570, Mercedes-Maybach S500,बेंटले कॉन्टिनेंटल जीटी यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.