... म्हणून आई होण्यासाठी आमृताचा नकार, अनेक वर्षांनी सत्य अखेर समोर

फक्त सैफसाठी अमृताने आई न होण्याचा घेतला निर्णय, लग्नानंतर अनेक वर्षांनी अखेर सत्य समोर  

Updated: Jun 18, 2022, 02:41 PM IST
... म्हणून आई होण्यासाठी आमृताचा नकार, अनेक वर्षांनी सत्य अखेर समोर  title=

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या लग्नापासून ते त्यांच्या घटस्फोटापर्यंतच्या बातम्या खूप चर्चेत असतात. सैफ-अमृता यांचं 1991 मध्ये लग्न झालं. लग्नाच्या वेळी सैफ अली खानचं वय अवघं 21 वर्षे होतं. त्याचबरोबर अमृता सिंगचं वय 33 वर्षे होतं. सैफ-अमृता यांच्या वयात 12 वर्षांचा फरक आहे.

इतकंच नाही तर 1991 मध्ये म्हणजे लग्नाच्यावेळी जिथे अमृता सिंग इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिथे सैफ अली खानने तेव्हा चित्रपटात पदार्पणही केलं नव्हतं. मात्र, या लग्नापासून सैफ-अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत.

सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर अमृता सिंगने हळूहळू सिनेमांमध्ये करण बंद केलं, तर सैफ त्याच्या सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाला. त्याने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 

सैफला उत्तम सिनेमाच्या ऑफर्स देखील येत होत्या.  सैफच्या लोकप्रियतेत वाढ होत होती. अशात मुले व्हावीत आणि सैफवर कोणत्याही प्रकारचे दडपण असावे असे अमृताला वाटत नव्हते. म्हणून तिने आई होण्याचा निर्णय टाळला. 

अमृताच्या या निर्णयानंतर 1995 साली तिने साराला जन्म दिला. त्यानंतर 6 वर्षांनंतर खान कुटुंबात इब्राहिम अली खानचा जन्म झाला. आता अमृता आणि सैफ विभक्त झाले असले, तर सैफ सारा आणि इब्राहिमसोबत वेळ व्यतीत करत असतो.