हे काय जीव घेण्याचं कारण असू शकतं का? पुण्यात घडली मन सुन्न करणारी घटना

पुण्यात एका तरुणाची हत्या झाली आहे. हत्येमागे अतिशय धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Updated: May 17, 2024, 05:22 PM IST
हे काय जीव घेण्याचं कारण असू शकतं का? पुण्यात घडली मन सुन्न करणारी घटना title=

Pune Crime News : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची कोत्याने हत्या करण्यात आली आहे. तपासादरम्यान हत्या करण्यामागे जे कारण उघडकीस आले आहे ते मन सुन्न करणारे आहे. या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.   

नेमकं काय घडलं?

डहाणूकर कॉलनी परिसरातील ही घटना आहे. श्रीनु बिसलावत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.  मारेकरी आणि श्रीनु यांच्यात महिनाभरापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून सहा जणांनी त्याची कोयत्याने वार करून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी सहाही आरोपींना अटक केली आहे.  केवळ एकमेकांकडे बघण्याच्या रागातून यांच्यात वाद झाला होता. 

पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून हत्या

परभणीच्या जिंतूरमध्ये एकाचा निघृण खून करण्यात आला. पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून चाकू वार करत ही हत्या केल्याची माहिती मिळतेय. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केलीय. 

पुण्यात उंटांची अमानुषपणे वाहतूक

आठ उंटांची अमानुषपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केलीय. पुण्यातून कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघड केला. 

पुण्यात श्वानाच्या पिल्लाला अमानुषपणे बेदम मारहाण

पुण्यात श्वानाच्या पिल्लाला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या विरोधात आता दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-याला वंचितच्याच कार्यकर्त्याकडून मारहाण

कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-याला वंचितच्याच कार्यकर्त्याने मारहाण केली. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजुतीतून ही घटना घडल्याचं समोर येतंय...वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना मारहाण केलीये...मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भिंवडी लोकसभा मतदारसंघात मिलिंद कांबळे यांना वंचितने एबी फॉर्म दिला होता. मात्र नामसाधर्म्याचा फायदा घेत दुस-याच मिलिंद कांबळेनं फॉर्म चोरून भरला, फॉर्म भरणा-या मिलिंद कांबळे विरोधात गुन्हा दाखल झाला होता...मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांने गैरसमजुतीतून पदाधिकारी मिलिंद कांबळे यांनाच मारहाण केलीये...