VIDEO : Amruta Khanvilkar नं ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत उभारली गुढी

Amruta Khanvilkar नं गुढीपाडवा स्पेशल हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अमृतानं गुढीपाडव्याच्या दिवशी ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे.

College | Updated: Mar 22, 2023, 06:31 PM IST
VIDEO : Amruta Khanvilkar नं ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत उभारली गुढी  title=

Amruta Khanvilkar Dance On Baharla Ha Madhumas : आज गुढीपाडव्यानिमित्तानं सगळ्यांनी आनंदानं नवीन वर्षाचे स्वागत केले. प्रत्येकानं त्यांच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच्या आपल्या घरच्या गुढीचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसले. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या गुढीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिचा गुढी उभारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण यावेळी अमृतानं हटके स्टाईलमध्ये सगळ्यांना भुरळ घातली आहे. (Amruta Khanvilkar) 

अमृतानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमृता तिच्या घराच्या गॅलरीत गुढी उभारताना दिसत आहे. यावेळी अमृतानं सध्या चर्चेत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील चर्चेत असलेल्या ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर डान्स केला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर याच गाण्यावर अमृतानं डान्स करत सगळ्यांना भुरळ घातली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Amruta Khanvilkar Dance) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Pathaan OTT Released : 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री प्रदर्शित झाला 'पठाण'

हा व्हिडीओ शेअर करत अमृतानं कॅप्शन दिलं की 'तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा… नुकताच ‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर प्रदर्शित झाला आणि यात काहीच शंका नाही की हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव असणा आहे… चित्रपटात अशी खूप मंडळी आहे ज्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. लव्ह यू टीम.' अमृताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'अमु मॅम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अमृता ताई तू खूप सुंदर दिसत आहेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'किती गोड आहेस अमु तू... तुझ्यामुळे पुरण पोळी देखील गोड झाली.' तर अभिनेत्री मंजीरी ओकनं तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत डोळ्यात हार्ट इमोजी आणि हार्ट इमोजी वापरलं आहे. तर काही लोक तिच्या लूकची चर्चा करत आहेत. अनेकांनी अमृताचा हा लूक आवडल्याचे म्हटले आहे.