बलात्कारामुळे भंगले कौमार्य - एमी शूमर

माझ्या न कळतच माझे कौमार्य भंग झाले. त्या वेळी आपण केवळ १७ वर्षांचे होते असेही एमीने मुलाखती दरम्यान सांगितले. 

Updated: Apr 29, 2018, 05:59 PM IST
बलात्कारामुळे भंगले कौमार्य - एमी शूमर title=

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कॉमेडियन आणि हॉलिवूडची अभिनेत्री एमी शूमर हिने आपल्या कौमार्याबद्धल (व्हर्जिनीटी) खळबळजनक वक्तव्य केले आहे. प्रियकराने केलेल्या बलातकारामुळे माझे कौमार्य भंगले असे शूमर हिने ओपरा विनफ्रेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या घटनेबाबत माहिती देताना एमीने सांगितले की, बलात्कार झाला तेव्हा मी झोपले होते. मी बेसावद (संवेदनाहीन) अवस्थेत असताना आणि माझी मान्यता नसतानाही प्रियकराने माझ्यावर बलात्कार केला. त्यामुळे माझ्या न कळतच माझे कौमार्य भंग झाले. त्या वेळी आपण केवळ १७ वर्षांचे होते असेही एमीने मुलाखती दरम्यान सांगितले. 

प्रियकरानेच केला बलात्कार

वेबसाईट 'एसशोबिज डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, एमी शूमरने या घटनेबाबत २०१६ मध्ये लिहिलेल्या आठवणी 'द गर्ज विथ द लॉअर बॅक टॅटू'मध्ये याबबत सांगितले होते. त्यावेळीही एमीने म्हटले होते की, प्रियकरासोबत झालेले तेव्हाचे शरीरसंबंध हे माझ्या संमतीशिवाय झाले होते. दरम्यान, एमीने आपल्या माजी प्रियकरावर आरोप तर, लावले. पण, त्याचे नाव मात्र तिने उघड केले नाही. उलट त्या प्रियकराबाबत सहानुभूती व्यक्त करत ती म्हणाली, आपल्या या कृत्याबद्धल त्याला नंतर पश्चाताप झाला. पण, हे सांगतानाच घडल्या प्रकाराचा आपल्यावर खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळे माझे मन दुभंगले. मला सातत्याने असे वाटत होते की, मी काहीतरी गमावून बसली आहे. एका बेसावद क्षणी माझ्यासोबत असे घडले आणि मी पूर्ण जागी झाल्यावर त्याने मला या कृत्याबाबत सांगितले. ज्यामुळे मला प्रचंड धक्का बसला, असेही एमी म्हणाली.

शरीरसंबंधासाठी माझी मान्यता नव्हती

दरम्यान, इतकी वर्षे उलटून गेल्यावर त्या घटनेबाबत आता काय वाटते असे विचारले असता, एमी शूमर सांगते, काही गोष्टी सोबत ठेवाव्या वाटल्या तर, ठेवाव्या, त्या दूर फेकून द्याव्या वाटल्या तर, फेकून द्याव्यात. मला व्यक्तिगत पातळीवर वाटते की, बलात्कारामुळे मी माझे कौमार्य (व्हर्जिनीटी) हरवून बसले. या गोष्टीला माझी सहमती नव्हती. मी यावर चर्चा कधीच केली नव्हती. आम्ही अशा प्रकारच्या संबंधांबाबत चर्चा केली होती. पण, संबंध ठेवावेत किंवा नाही याबाबत मात्र आम्ही चर्चा केली नव्हती. आम्ही एकमेकांसाठी अगदीच खुले होतो.