'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाचा टीझर आऊट

आपल्या नावावरून या सिनेमाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 18, 2018, 02:19 PM IST
'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाचा टीझर आऊट  title=

मुंबई : आपल्या नावावरून या सिनेमाने प्रेक्षकांच लक्ष वेधलं आहे. 

दिग्दर्शक राजीव एस रूईया माझ्या बायकोचा प्रियकर हे आपला मराठी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे. अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि भाग्यश्री मोटे हे या सिनेमांत पाहायला मिळणार आहे. 

काय आहे सिनेमांत? 

सिनेमाचं नाव हे सध्या चर्चेत आहे. राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव एस. रूईया यांनी केलं आहे. चित्रपटाच्या नावातच कथा लपलेली आहे. विनोदी व कौटुंबिक पार्श्वभूमीवर कथा आधारित असल्यामुळे प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन होऊ शकतं.

कोण कोण आहे सिनेमांत? 

प्रदीप शर्मा आणि दीपक रुईया निर्मित या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, प्रिया गमरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनुपमा ताकमोगे, पदम सिंग इत्यादी कलाकार या चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटांत एकूण चार गाणी आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण भोर आणि मुंबईत पार पडलं