अंकिताने शेअर केला मिलिंदसोबतचा खास फोटो

या फोटोची चर्चा 

अंकिताने शेअर केला मिलिंदसोबतचा खास फोटो  title=

मुंबई : मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची 26 वर्षाने लहान असलेली पत्नी अंकिता कंवर कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर अनेकदा हे आपल्या वयामुळे ट्रोल देखील झाले आहेत. मात्र या दोघांनी कधीच कुणाचा विचार केला नाही आणि लग्न केलं. लग्नानंतर हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसले. आताच अंकिताने मिलिंदसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. 

अंकिता मिलिंदसोबत काढलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. कधी वर्कआऊट करताना तर कधी ट्रिपवर फिरायला गेलेले अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असतात. अंकिताने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये या दोघांची धम्माल सुरू आहे. या फोटोत हे दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

 

Now until forever  #alwaysandforever

A post shared by Ankita Konwar (@earthy_5) on

22 एप्रिल 2018 मध्ये मिलिंद आणि अंकिताने लग्न केलं होतं. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तसेच अशी देखील चर्चा आहे की, अंकिता आणि मिलिंद बिग बॉस सिझन 12 मध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी बिग बॉसमध्ये अनेक जोड्या देखील दिसणार आहेत.