Anushka Sharma Birthday : 3 Idiots मध्ये करीनाच्या ऐवजी दिसली असती अनुष्का शर्मा, ऑडिशनचा 'तो' Video Viral

Anushka Sharma Birthday : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

श्वेता चव्हाण | Updated: May 1, 2023, 03:17 PM IST
Anushka Sharma Birthday : 3 Idiots मध्ये करीनाच्या ऐवजी दिसली असती अनुष्का शर्मा, ऑडिशनचा 'तो' Video Viral title=
Anushka Sharma Birthday

Anushka Sharma Birthday : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. तीच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे तर कधी सडेतोड प्रतिक्रियांमुळे नेहमी चर्चेत असते. अनुष्काने आपल्या दमदार अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीत स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानच्या 'रब ने बना द जोडी' (Rab Ne Bana Di Jodi) या चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतेय. त्यानंतर अनेक दामदार चित्रपटांमध्ये काम करत अनुष्काने प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'साठी अनुष्काने ऑडिशन दिले होते. मात्र या चित्रपटासाठी तिची निवड झाली नाही. सध्या सोशल मीडियावर 3 इडियट्स या चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे.   

अनुष्का शर्मा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये  '3 इडियट्स' (3 Idiots ) चित्रपटासाठी ऑडिशन देताना दिसत आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा 'मुन्नाभाई एमबीबीएस' (munna bhai MBBS) या चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहे. हा डायलॉग अभिनेत्री ग्रेसी सिंघने म्हाटला होता. अनुष्का शर्माच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव झाला. ऑडिशन देऊनही अनुष्का शर्माची '3 इडियट्स' (Anushka Sharma Birthday) चित्रपटासाठी निवड झाली नव्हती. या चित्रपटासाठी अभिनेत्री करीना कपूर खानची निवड करण्यात आली.  

'3 इडियट्स' नंतर 5 वर्षानंतर आमिर खानसोबत केले काम

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा खूपच लहान दिसत आहे. तिने हिरवा रंगाचा टॉप घातला असून अनुष्काच्या या व्हिडीओ  वर चाहत्यांनी प्रचंड प्रतिक्रीया दिली. ऑडिशन दिल्यानंतर अनुष्काची '3 इडियट्स' चित्रपटासाठी निवड झाली नाही. मात्र 5 वर्षांनंतरच राजकुमार हिरानी यांनी तिची आमिर खानसोबत पीके (PK) या चित्रपत्रासाठी निवड केली ज्यामध्ये तिने पत्रकाराची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री ते निर्माता असा आहे अनुष्काचा प्रवास 

अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. तिने शाहरुख खानसोबतचा 'झिरो' हा शेवटचा चित्रपट केला. नुकतेच अनुष्काने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून 'बुलबुल' या चित्रपताची निर्मिती केली. हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित झाला होता.