आरोह वेलणकरच्या लग्नाचा व्हिडिओ पाहिलात का?

मुंबई : 'रेगे' या चित्रपटातून भेटीला आलेला  आरोहण वेलणकर लग्नबंधनात अडकला. आता त्याच्या लग्नाचा व्हिडिओ आला आहे. या व्हिडिओत आरोहची लव्हस्टोरी आणि लग्नाचे खास क्षण कॅप्चर झाले आहेत. आरोहणने फेसबुकच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती.आरोह हा मूळचा पुण्याचा आहे. अंकिता शिंगवी या त्याच्या मैत्रिणीसोबत लग्नबंधनात अडकला आहे. या दोघांची भेट ज्या दिवशी झाली त्या दिवसाची खास आठवण शेअर करत त्याने एक फोटो पोस्ट केला होता. अंकिता देखील पुण्याची आहे. पण ती चित्रपटसृष्टीतील नाही.  आरोह वेलणकर रेगे, घंटा अशा मराठी चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आला. 

अशी झाली आरोह आणि अंकिताची ओळख

आरोह आणि अंकिताची भेट MIT college, Pune येथे झाली होती. शिक्षणादरम्यानच दोघे प्रेमात पडले आणि लग्नाचा निर्णय घेतला. महाबळेश्वर येथे दोघांनी डेस्टीनेशन वेडींग केले आहे. लग्नाअगोदर या दोघांनी सुंदर प्री-वेडींग फोटोशूटही केले होते. आरोह वेलणकर 11 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकला आहे. दीर्घकालीन गर्लफ्रेंड अंकिता शिंघवीसोबत आरोहने लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत. आरोहची पत्नी अंकिता ही मारवाडी आहे त्यामुळे या दोघांनी मारवाडी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर यांचे रिसेप्शन मुंबई आणि पुणे याठिकाणी झाले. 

अशी केली होती लग्नाची तयारी 

टेक्नोसॅव्ही वेडींग म्हणजे आरोहने ‘आरोह वेड्स अंकिता’हे एक अॅप लाँच केले होते. त्यात त्याच्या लग्नाबद्दल सर्व माहिती या अॅपद्वारे पाहुण्यांना कळणार होती.सर्व नियोजन स्मार्ट अॅप पद्धतीने झालं होतं.त्यामुळे अनेक वैशिष्ट्यांनी परिपणूर्ण असलेला हा विवाहसोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. P16 Stuidos यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे.