Bad News: तृप्ती डिमरी गर्भवती? फोटो रिलीज होताच चाहत्यांचा अपेक्षाभंग!

Triptii Dimri :  'ॲनिमल' चित्रपट आणि रणबीर कपूरची अभिनेत्री तृप्ती डिमरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा बेबी बंपसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती लग्नापूर्वी प्रेग्नेंट आहे की काय अशी चर्चा रंगली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 20, 2024, 12:02 PM IST
Bad News: तृप्ती डिमरी गर्भवती? फोटो रिलीज होताच चाहत्यांचा अपेक्षाभंग! title=
Bad News Trupti Dimri pregnant As soon as the photo is released the fans are disappointed vicky kaushal ammy virk first video viral

Triptii Dimri News : 'ॲनिमल' चित्रपटातून अचानक प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. 'ॲनिमल' अगदी छोटी भूमिका साकारणारी ही अभिनेत्रीने चाहत्यांना घायाळ करण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही. कमी वेळात तिने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. 29 वर्षांची तृप्ती डिमरीचं अजून लग्न झालेलं नाही. तर सोशल मीडियावर तिचा एक फोटो तुफान व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतंय. त्यामुळे लग्नापूर्वी तृप्ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे. पण थांबा आम्ही सांगतो नेमकं प्रकरण काय आहे. (Bad News Trupti Dimri pregnant As soon as the photo is released the fans are disappointed vicky kaushal ammy virk first video viral)

तृप्ती डिमरी गर्भवती? 

नुकताच काही दिवसांपूर्वी लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी तृप्ती डिमरीनेही तिचा ग्लॅमरस अवतार दाखवला होता. मग त्यानंतर तिचा असा बेबी बंप असलेला फोटो, नेमकं काय प्रकरण. तर तृप्ती ही प्रेग्नेंट नसून हा तिच्या आगामी चित्रपटाच पोस्टर (Bad Newz Poster) आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. ज्यात ती गर्भवती दिसत असून दोन अभिनेत्याध्ये अडकलेली दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 'बॅड न्यूज' असं चित्रपटाच नाव असून तृप्ती विकी आणि एमीसोबत रोमान्स करताना दिसून येतं आहे. या चित्रपटाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाज मुख्य भूमिकेत असून विकी कौशल आणि एमी विर्कसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट त्रिकोणी प्रेमी ट्विस्ट असून चाहत्यांवर काय जादू करेल हे वेळेच सांगेल.

रणबीर सोबत पहिल्या चित्रपटात इंटिमेट सीनमुळे ती गाजली होती. आता दोन अभिनेत्यांसोबत तिचा रोमान्स या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान हा चित्रपट यावर्षी 19 जुलै 2024 ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.