'बाला'ने दोन दिवसांतच कमावला निर्मिती खर्च, छप्पर फाड कमाई

आयुष्मान खुरानाने मोडले स्वतःचेच रेकॉर्ड 

Updated: Nov 11, 2019, 12:47 PM IST
'बाला'ने दोन दिवसांतच कमावला निर्मिती खर्च, छप्पर फाड कमाई  title=

मुंबई : आयुष्मान खुरानाचा 'बाला' हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आहे. सिनेमाने पहिल्या चार दिवसांत सिनेमाचं संपूर्ण बजेट कमावलं आहे. निर्मितीचा खर्च अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून अधिक कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. आयुष्मान खुरानाच्या अगोदरच्या सिनेमाचे सर्व रेकॉर्ड 'बाला'ने तोडला आहे. 

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार 'बाला'ने तिसऱ्या दिवशी 20 करोड कलेक्शन केलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने शुक्रवारी 10.15 करो़ड रुपये, शनिवारी 15.73 करोड रुपये कलेक्शन केलं आहे. तिसऱ्या दिवसाच कलेक्शन मिळून 'बाला'ने एकूण 45.95 करोड रुपये कमावले आहेत. 

पहिल्या दोन दिवसांतच प्रेक्षकांकडून मिळणारी प्रतिक्रिया पाहताच हा सिनेमा चांगली कमाई करेल असा विश्वास समीक्षकांनी मांडला होता. पहिल्या तीन दिवसांतच या सिनेमाने 40 करोडहून अधिक कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात एवढी कमाई करणारा हा आयुष्मानचा तिसरा सिनेमा आहे. 'बाला'प्रमाणेच 'बधाई हो' आणि 'ड्रीम गर्ल'ने देखील पहिल्या आठवड्यात एवढी कमाई केली होती. 

'बाला' सिनेमातून आम्ही खूप चांगला आणि मजबूत सामाजिक संदेश दिल्याचं आयुष्मान खुराना सांगतो. मला आनंद आहे की, प्रेक्षकांना हा सिनेमा इतका आवडला. मला आशा आहे, हा सिनेमा भारतभर प्रेक्षकांना पसंत पडेल,' असं आयुष्मानने सांगितलं आहे. 

'बाला' सिनेमा भारतात तीन हजार ठिकाणी प्रदर्शित झाला असून हा सिनेमा जगभरात 3550 स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज होणारा आयुष्मान खानचा हा पहिला सिनेमा आहे.