'Best Friend Forever'-अनुष्का शर्मा

अनुष्का-विराट सध्या न्यूझीलंडमध्ये आनंद लुटताना दिसत आहेत.  

Updated: Feb 2, 2019, 03:39 PM IST
'Best Friend Forever'-अनुष्का शर्मा title=

मुंबई: क्रिकेटविश्वातून आणि कलाविश्वातून वेळ काढत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकट कर्णधार विराट कोहली सध्या न्यूझीलंडमध्ये आनंद लुटताना दिसत आहेत. हे जोडपे त्यांच्या व्यस्त जिवनातून नेहमी एकमेकांना वेळ देत असतात आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून फोटो पोस्ट करत चाहत्यांना त्यांच्या व्ययक्तिक आयुष्यातील माहित देत असतात. अनुष्काने स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.  फोटो शेअर करत अनुष्काने 'बेस्ट फ्रेंड फोरेव्हर' असे कॅप्शन दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Best friend forever 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

विराट सध्या विश्रांती घेत आहे. तर शाहरुख खान स्टारर 'झिरो' सिनेमाच्या शूटिंग नंतर  अनुष्काही तिच्या न्यूझीलंड सूट्टीचा आनंद घेत आहे. पण शाहरुख आणि अनुष्काच्या 'झिरो 'सिनेमा बॉक्स ऑफिसवर फोल ठरला. पण  सिनेमातील अनुष्का शर्माच्या भूमिकेचे कौतूक झाले. या सिनेमात अनुष्काने दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे.   

 

काही दिवसांपूर्वी विरुष्काने ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचे स्वागत केले. तेव्हाही त्यांनी एक फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर करत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्ये विरुष्का पार्टी लूक मध्ये दिसत आहेत.