आधी सेल्फी काढला मग बाटली फेकून मारली... अभिनेत्यासोबत धक्कादायक प्रकार VIDEO VIRAL

Actor Attacked by fans Viral Video : अभिनेत्याला चाहत्यांनी भर रस्त्यावर मारली बाटली... या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ आला समोर सोशल मीडियावर एकच चर्चा...

दिक्षा पाटील | Updated: Sep 16, 2023, 06:50 PM IST
आधी सेल्फी काढला मग बाटली फेकून मारली... अभिनेत्यासोबत धक्कादायक प्रकार VIDEO VIRAL  title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Akash Choudhary Viral Video : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे सगळ्या गोष्टी लगेच व्हायरल होतात. अनेकदा आपल्याला सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या अपडेट देखीस तिथेच मिळतात. अशात आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाग्य लक्ष्मी' चा अभिनेता आकाश चौधरीसोबत चाहतयांना असं काही केलं आहे की सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ते पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. 

आकाश चौधरीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत आकाशनं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. या व्हिडीओत आकाशसोबत फोटो काढण्यासाठी त्याचे काही चाहते समोर आल्याचे पाहायला मिळते. आकाशनं एका चाहत्यासोबत सेल्फी देखील काढला. त्यात एक चाहता त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी येताच चाहत्यानं आकाशवर हात उगारला. तेव्हा आकाश त्याला बोलतो की हे काय करतोयस... जेव्हा हा चाहता मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आकाश त्याची गाडी कुठे आहे हे बोलत तिथून जाण्याचा प्रयत्न करतो. आकाशला त्याची गाडी दिसताच तो तिथून जातो. आकाश पुढे जाताच त्याचा एक चाहता त्याच्यावर बॉटल फेकू मारतो. यावरून आकाशला खूप जास्त राग येतो आणि तो त्याच्या चाहत्यावर संतापतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पापाराझींसमोर चाहत्यांनी असे केल्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट केली आहे. लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंगनं कमेंट करत आश्चर्यचकित झाल्याचे इमोजी शेअर केले आहे. तर दुसरीकडे आकाशचे चाहते व्हिडीओवर कमेंट करत त्या लोकांविरोधात अॅक्शन घ्यायला हवी असे बोलत आहे. दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली की काही लोकांना संस्कार नावाची गोष्ट नसते. चाहते असण्याचा असा फायदा घेतात. 

हेही वाचा : 'स्किट झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या जजमेंटचा...', 'हास्यजत्रा' सोडण्यावर विशाखा सुभेदारनं सोडलं मौन

आकाश हा फक्त एक लोकप्रिय अभिनेता नाही तर माजी मिस्टर इंडिया देखील आहे. आकाशचे सोशल मीडियावर लाखो चाहते देखील आहेत. आकाशचे इन्स्टाग्रामवर 391K फॉलोवर्स आहेत. त्याच्या पोस्ट या नेहमीच व्हायरल होत असतात. दरम्यान, आकाशनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिलेली नाही.