...म्हणून बिग बी 'जलसा' बाहेर चाहत्यांची भेट घेणार नाहीत

प्रत्येक रविवारी त्यांच्या मुंबईतील 'जलसा' बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतात.  

Updated: Jun 20, 2020, 01:17 PM IST
...म्हणून बिग बी 'जलसा' बाहेर चाहत्यांची भेट घेणार नाहीत title=

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडत असतात. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नुकताच बिग बींनी त्यांचे काही जुने फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. साता समुद्रापार देखील त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते  दर रविवारी मोठ्या संख्येने त्यांच्या घराच्या बाहेर गर्दी करतात. प्रत्येक रविवारी त्यांच्या मुंबईतील 'जलसा' बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतात.

'जलसा' बाहेरील फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'मशहूर होने का शौक़ नहीं मुझे; आप मुझे पहचानते हैं बस इतना काफ़ी है' असं लिहिलं आहे. दर रविवारी बिग बी चाहत्यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे ते घरा बाहेर पडणार नाहीत. 

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तरी देखील बिग बींना पाहण्यासाठी जलसा बाहेर चाहत्यांची गर्दी जमलेली असते.  या पार्श्वभूमीवर बिग बींनी त्यांना पाहण्यासाठी घराजवळ गर्दी न करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.