सलमानने बिग बॉस ११ मधून बिपाशा - करणच्या कंडोम जाहिरातीला केला विरोध

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 27, 2017, 05:03 PM IST
सलमानने बिग बॉस ११ मधून बिपाशा - करणच्या कंडोम जाहिरातीला केला विरोध  title=

नवी दिल्ली : बिग बॉस ११ मध्ये ज्या स्पर्धकांना सर्वाधिक कमी मत मिळतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. मात्र 

आता सुपरस्टार सलमान खानने एका जाहिरातीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आणि या जाहिरातीमध्ये अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर दिसत आहेत. ही जाहिरात कंडोमची असून सलमानने या जाहिरातीला विरोध केला आहे. ही जाहिरात बिग बॉसच्या वेळी दाखवण्यास मज्जाव केला आहे. 

डीएनएने स्पॉटबॉयमार्फत ही माहिती दिली आहे की, कलर्सने सलमान खानच्या सांगण्यावर तात्काळ ही जाहिरात दाखवण्यास बंद केली आहे. 

सलमानने का केलं असं? 

सलमानचे असं म्हणणं आहे की, ही जाहिरात अतिशय हॉट आहे. सलमानच्या बिग बॉस हा कार्यक्रम संपूर्ण कुटूंब एकत्र बसून पाहतात. अशावेळी ही जाहिरात लावणं चुकीचं आहे. आणि यामुळेच सलमानने ब्रॉडकास्टर्स कंडोमच्या या जाहिरातीला हटवण्याचा सल्ला दिला. कलर्सने देखील सलमानच्या या वक्तव्यावर कोणतेही चर्चा न करता जाहिरात काढण्याचा निर्णय घेतला. 

सलमान खानचं लग्न झालं नसलं तरी ही तो एक फॅमिली मॅन आहे. सलमान खान आपल्या सिनेमात देखील अतिशय इंटेंस लव मेकिंग सिन करण्यास नकार देतो. तसेच इतर अभिनेत्यांप्रमाणे सलमान लिप - लॉक किस करणं देखील टाळतो. आणि सलमान बिग बॉस हा पूर्णपणे फॅमिली शो असल्याचं सांगतो. त्यामुळे तो या जाहिरातीला विरोध करत आहे.