बिग बॉस Ex कन्टेस्टेंट मोनालिसाचा नवा भाभी अवतार...

बिग बॉस १० यातून देशभरात आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मोनालिसा लवकरच नव्या अंदाजात परतणार आहे. 

Updated: Apr 11, 2018, 04:38 PM IST
बिग बॉस Ex कन्टेस्टेंट मोनालिसाचा नवा भाभी अवतार... title=

मुंबई : भोजपूरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस १० यातून देशभरात आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मोनालिसा लवकरच नव्या अंदाजात परतणार आहे. यावेळी तिचा भाभी अवतार दिसेल. मोनालिसा लवकरच बंगाली वेब सिरीज दुपूर ठाकुरपो मध्ये दिसेल. यात ती भाभीच्या भूमिकेत आहे. मोनालिसाने आपल्या या वेब सिरीजचा टीझर इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. टीझर पाहुन तिचा हॉट अंदाज तुम्हाला पाहता येईल. 

झुमाचे लूक्स आणि अदा इंटरेस्टिंग

हे दुपुर ठाकुरपो चे दुसरे सिजन आहे आणि यात ती झुमा बोदीच्या भूमिकेत दिसेल. शो च्या पहिल्या सिजनमध्ये स्वास्तिका मुखर्जीने झुमा बोदीची भूमिका निभावली आहे. या वेब सिरीजचे प्रसारण होईचोई नावाच्या वेब चॅनलवरुन होईल. या सिजनमधील झुमाचे लूक्स आणि अदा मजेशीर आणि इंटरेस्टिंग आहेत. मौनाने या टीझरसोबत काही बिहाईड द सीन फोटोजही शेअर केले आहेत.

 

Very excited to announce my next project with you all... Presenting the teaser of my web series called #DupurThakurpo Season 2. I will be portraying the character of “JHUMA BOUDI “! Super Happy to be working for a Super Successful Bengali WEBSERIES.... #Gratitude #Blessed #Happy @hoichoi.tv @svfsocial @iammony

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

या अभिनेत्या सोबत केले लग्न

मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिश्वास आहे आणि तिने आतापर्यंत १२५ भोजपूरी सिनेमात काम केले आहे. मोनालिसाने बिग बॉस १० मध्ये बॉयफ्रेंड विक्रांत सिंह राजपूतसोबत लग्न केले होते. विक्रांत भोजपूरी अभिनेता आहे. मोनालिसा या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांना कसे प्रभावित करते हे पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे.