बिग बॉसमध्ये येण्याअगोदर अनूप जलोटांनी केलं हेअर ट्रान्सप्लान्ट...

एका केसाची किंमत ऐकून थक्क व्हाल 

बिग बॉसमध्ये येण्याअगोदर अनूप जलोटांनी केलं हेअर ट्रान्सप्लान्ट...  title=

मुंबई : बिग बॉसच्या घरात जेव्हापासून अनूप जलोटा आणि जसलीनने एन्ट्री घेतली आहे तेव्हापासून हे चर्चेत आहे. जसलीन ही अनूप जलोटा यांच्यापेक्षा 37 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत खूप गॉसिप झाले. मात्र या शोमध्ये अनूप जलोटा यांनी काही खास कमाल केलेली नाही. याचवेळी अनूप जलोटा यांनी आपली खूप खाजगी गोष्ट बिग बॉसच्या घरात सगळ्यांसमोर शेअर केली. यामुळे सगळेच थक्क झाले. 

दीपक ठाकूर अनूप जलोटा यांच्याशी बोलताना केसांचा विषय निघाला. तेव्हा अनूप जलोटा यांनी अतिशय धक्कादायक माहिती शेअर केली. अनूप जलोटा यांनी केसांवर जवळपास 7 लाख रुपये खर्च केले आहेत. अनूप यांना पू्र्ण टक्कल पडलं होतं यामुळे त्यांनी बिग बॉसच्या घरात येण्या अगोदर हेअर ट्रान्सप्लान्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, मला एका केसाला 100 रुपये मोजावे लागले. 

अनूप जलोटा यांनी सांगितलं की, त्यांनी जवळपास 7 हजार केस लावले आहेत. अनूप जलोटा यांनी काही केस आपल्या दाढीमधून देखील घेतले आहेत. अनूप जलोटा सांगतात की, काही जण एका केसाचे 50 रुपये घेतात पण मी ज्याकडून हेअर ट्रान्सप्लान्ट केलं ते थोडे महाग होते.