जसलीनच्या वडिलांचा मोठा खुलासा, अनुप जलोटा का गेले बिग बॉसमध्ये?

काय म्हणाले जसलीनचे वडिल 

जसलीनच्या वडिलांचा मोठा खुलासा, अनुप जलोटा का गेले बिग बॉसमध्ये? title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून फक्त दोनचं गोष्टींची चर्चा आहे. एक बिग बॉस 12 चा सिझन आणि त्यातील अनुप जलोटा - जसलीन हे स्पर्धक. अनुप या शोमध्ये आपल्यापेक्षा 37 वर्षांपेक्षा लहान असलेल्या गर्लफ्रेंड जसलीन मथारूसोबत पोहोचली. जसलीनने या शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला की, अनूप यांना गेल्या 3 वर्षांपासून मी डेट करत आहे. 

या प्रकरणाबाबत बॉलीवूड लाइफने जसलीनचे वडिल केसर मथारू यांच्याशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून केसर मथारू स्टेटमेंट देत आहे. आता पुन्हा त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. केसर मथारू यांनी सांगितलं की, अनुप जलोटा यांनी बिग बॉसमध्ये माझ्या मुलीला म्हणजे जसलीनला येण्यासाठी कसं तयार केलं. मथारू म्हणाले की, आम्ही अनुप जलोटा यांना अनेक वर्षांपासून ओळखतो.

एकदा ते रेकॉर्डिंगला आमच्या घराजवळ आले होते तेव्हा आम्ही त्यांना चहा करता घरी बोलावलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, कशा प्रकारे जसलीनला बिग बॉस करता अप्रोच करण्यात आलं आहे. जसलीन करता एका जोडीदाराची गरज आहे. तेव्हा मीच त्यांना सांगितलं की, तुम्हीच तिच्यासोबत बिग बॉसमध्ये जा. मला वाटतं होतं की, अनूप आणि जसलीन यांनी गुरू - शिष्य म्हणून या शोमध्ये जावं. पहिलं त्यांनी याला नकार दिला. त्यांच असं म्हणणं होतं की, मी त्या बिग बॉसच्या घरात फिट बसणार नाही. त्यांच्याकडे भरपूर शो असल्यामुळे ते बिग बॉसमध्ये जाऊ शकत नाही. 

तेव्हा मी त्यांना सांगितलं की, ही 3 महिन्याची रेस्ट आहे असा विचार करा. आणि मग ते यासाठी तयार झाले. मात्र अनूप आणि जसलीन यांच्या नात्याबद्दल आम्हाला खरंच काही माहित नव्हतं. हे कळल्यानंतर आम्ही टीव्ही पाहणं बंद केलं. मात्र आता असं ऐकलं आहे की, ती चांगल खेळत आहे. आमच्या शुभेच्छा तिच्यासोबत आहेत.