बिग बॉसवर यासाठी भडकला सलमान खान

काय म्हणाला 

बिग बॉसवर यासाठी भडकला सलमान खान  title=

मुंबई : बिग बॉसचा हा विकेंड अगदी धमाकेदार होणार आहे. या सिझनमध्ये सलमान खान आतापर्यंत कंटेस्टेंट्सोबत खूप मस्करी करताना दिसत आहे. लेकिन या सिझनमध्ये पहिल्यांदा सलमान खानचा राग पाहायला मिळत आहे. एवढंच काय सलमान खानने बिग बॉस सोडण्याची धमकी देखील दिली आहे. 

सलमान खान या आठवड्यातील कॅप्टंसी टास्क दरम्यान सबा आणि सृष्टीमध्ये झालेल्या वादात दोघांची क्लास घेणार आहे. शोच्या प्रोमोनुसार सलमान म्हणतो की, घरात हिंसा आणि मारामारीला मनाई आहे. घरात कुणी लाथ मारणार आहे तर कुणी पंच मारत आहे. 

सलमान खान आपल्या घरातल्यांना सांगतो की, यानंतर तुम्ही घरातील हिस्सा असाल. पण अशा घराचा हिस्सा मी बनणार नाही. हे एकदम बकवास आहे. सबा आणि सृष्टीला मी घरातून काढून टाकू. जर बिग बॉसला वाटतं आहे की मी तुमच्याविरूद्ध जात आहे तर तुम्ही देखील घराबाहेर काढू शकता.