बॉबी देओलने रेस ३ साठी बनवली बॉडी...पाहा त्याचा लूक

पोस्टर बॉईज या सिनेमातून पुनरागमन केलेला बॉबी देओल पुन्हा बॉलीवूडमध्ये दमदार एंट्री करतोय. यासाठीची तयारीही जोरात सुरु आहे. बॉबी देओल रेमो डिसूजाच्या आगामी रेस ३ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बॉबी देओलशिवाय सलमान खानही आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 28, 2017, 07:37 PM IST
बॉबी देओलने रेस ३ साठी बनवली बॉडी...पाहा त्याचा लूक title=

मुंबई : पोस्टर बॉईज या सिनेमातून पुनरागमन केलेला बॉबी देओल पुन्हा बॉलीवूडमध्ये दमदार एंट्री करतोय. यासाठीची तयारीही जोरात सुरु आहे. बॉबी देओल रेमो डिसूजाच्या आगामी रेस ३ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बॉबी देओलशिवाय सलमान खानही आहे. 

रेस ३मध्ये बॉबी देओल नेव्हर सीन बिफोर अवतारात असणार आहे. यासाठी बॉबी त्याच्या बॉडीवर खूप मेहनतही घेतोय. बॉबीने नुकताच एक फोटो शेअऱ केलाय. या फोटोला त्याने कॅप्शनही दिलीये.

तो म्हणाला, जेव्हा केलेल्या मेहनतीचे चीज होते. थँक्यू सलमान खान प्रोत्साहित केल्याबद्दल.

लोकांनी दिल्या या कमेंट

बॉबी देओलने हा फोटो ट्विटरवर पोस्ट करताच लोकांनी कमेंटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. लोकांनी बॉबी देओलच्या स्लिम आणि स्लीक बॉडी बनवल्याबद्दल कौतुक केले.

युझर्स काय म्हणाले?

एक यूझर म्हणाला, सिनेमासाठी बेस्ट ऑफ लक पाजी. रेस ३मध्ये यशस्वी व्हा. तर दुसरीकडे एक युझर म्हणाला, देर आए दुरुस्त आए. कीप इट अप.

सलमानने दिले प्रोत्साहन

रेस ३मधील लूकसाठी सलमानने प्रेरित केल्याचे बॉबीचे म्हणणे आहे. त्याने ट्विटरवरन सलमानचे आभारही मानलेत. 

रेस ३ची कास्ट

रेस ३ हा सिनेमा रेसच्या सीरिजमधील तिसरा भाग आहे. रमेश तौरानी आणि सलमान खान मिळून या सिनेमाची निर्मिती करतायत. रेस ३मध्ये बॉबी आणि सलमानव्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस, डेझी शाह, पुजा हेगडे आणि साकिब सलीम यांच्या भूमिका आहेत.

 

रेस ३मध्ये आधी सैफ अली खान दिसणार होता. मात्र काही महिन्यांनी सैफच्या जागी सलमान काम करणार असल्याचे निश्तिच झाले.