'या' मोठ्या निर्णयापासून आमिर खान अनभिज्ञ

कलाविश्वात होणाऱ्या अशाच काही चर्चांपैकी एक म्हणजे....

Updated: Nov 5, 2018, 12:34 PM IST
'या' मोठ्या निर्णयापासून  आमिर खान अनभिज्ञ title=

मुंबई : अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून कलानविश्वात पाहायला मिळत आहेत. कतरिनाच्या अफलातून नृत्यशैलीपासून ते अगदी या चित्रपटातील संवादांपर्यत बऱ्याच गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

'ठग्स'विषयी होणाऱ्या अशाच काही चर्चांपैकी एक म्हणजे या चित्रपटाच्या तिकिट दरांची. सर्वसामान्यपणे चित्रपट तिकिटांच्या दरांपेक्षा 'ठग्स'चे दर हे दहा टक्क्यांनी जास्त असणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच चर्चेत आलं. 

'परफेक्शनिस्ट' आमिरला ज्यावेळी याविषयी विचारण्यात आलं तेव्हा या साऱ्याविषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं त्याने सांगितलं. सोबतच सर्वच आर्थिक स्तरातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता यावा, असा त्याचा मानस आहे. 

दिवाळी धामधुमीच्या माहोलात प्रदर्शित होणाऱ्या 'ठग्स'च्या तिकिटांमध्ये झालेल्या वाढीबद्दल मात्र आमिर अनभिज्ञ असल्याचं त्याने सांगितलं. 

'या चित्रपटाचा निर्मिती खर्च जास्त आहे, हे मी जाणतो. माझं मत विचारात घ्यायचं झासं तर तिकिटांचे दर कमी असावेत असंच मला वाटतं. त्यामुळे आपल्या येथे अशी चित्रपटगृह उभी राहिली पाहिजेत जेथे माफक सर्व आर्थिक स्तरातील प्रेक्ष जाऊन चित्रपट पाहू शकतील', असं आमिर म्हणाला. 

भारतात अतिशय सुरेख अशा चित्रपटगृहांची निर्मिती व्हावी जेथे मध्यमवर्गीयसुद्धा एखाद्या चित्रपटाचा तितकाच आनंद घेऊ शकतील, अशी आशा व्यक्त करत आमिरने भविष्यात त्याचं हे स्वप्न साकार होण्यची कामना केली. 

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित 'ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचा निर्मिती खर्च हा ३०० कोटींच्या घरात असून, त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाची अतुलनीय साहदृश्यं पाहचा येणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता तगडी स्टारकास्ट आणि तितकंच तगडं बजेट असणारा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.