Laxmiiच्या निमित्तानं खिलाडी कुमारपेक्षा 'या' अभिनेत्याला प्रेक्षकांची पसंती

ओळखला का हा चेहरा? 

Updated: Nov 11, 2020, 09:52 AM IST
Laxmiiच्या निमित्तानं खिलाडी कुमारपेक्षा 'या' अभिनेत्याला प्रेक्षकांची पसंती  title=
छाया सौजन्य - इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार akshay kumar याची मुख्य भूमिका असणारा Laxmii लक्ष्मी हा चित्रपट नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही काळापासून या चित्रपटाबाबत बरंच कुतूहल आणि चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. 

मुख्य म्हणजे ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचीच झलक जास्त प्रमाणात दिसत होती. पण, चित्रपच प्रदर्शित झाल्यानंतर मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. 

मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या खिलाडी कुमारला प्रेक्षकांना संमिश्र प्रतिसाद दिला. पण, सहाय्यक भूमिकेत दिसलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याची मात्र वाहवा झाली. हा अभिनेता म्हणजे शरद केळकर sharad kelkar. 

चित्रपटात शरदची एक लहानशी भूमिका आहे. असं असलं तरीही खिलाडी कुमारपेक्षाही त्याच्याच भूमिकेला चाहत्यांनी उचलून धरलं आहे. आपण साकारलेल्या भूमिकेला मिळणारं चाहत्यांचं प्रेम आणि चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून शरदनंही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचेच मनापासून आभार मानले आहेत. या भूमिकेसाठी पात्र समजत चित्रपटात संधी दिल्याबद्दल त्यानं सर्वांचेच आभार मानले. 

 

येत्या काळातही शरद अशाच काही दमदार चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अल्यान' या तामिळ चित्रपटासमवेत तो 'भुज द प्राइड ऑफ इंडिया', 'अवैध', 'जर्सी', 'एक नंबर' अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे.