करीनाच्या डोक्यात का होता सरोगेट मदरचा भुंगा?

तिला असं का वाटत होतं?   

Updated: Aug 13, 2021, 09:48 PM IST
करीनाच्या डोक्यात का होता सरोगेट मदरचा भुंगा?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) या जोडीकडे बॉलिवूडमधील स्टार कपल, म्हणून पाहिलं जातं. एकेमेकांच्या करिअरमध्ये महत्त्वाच्या निर्णयांत साथ देण्यासोबतच ही जोडी इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर परखड भूमिका मांडत असते. सध्या करीनाला सैफची साथ मिळत आहे ती म्हणजे तिनं लिहिलेल्या 'प्रेगनेंन्सी बायबल' या पुस्तकासाठी. 

करीनाच्या या पुस्तकामध्ये तिच्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यापैकी एक खुलासा तिच्या पतीकडूनही करण्यात आला आहे. ज्यानुसार करीनानं जीवनाच्या एका टप्प्यावर सरोगसीच्या माध्यमातून मातृत्त्व स्वीकारण्याचाही विचार केला होता. 

असं म्हटलं जातंय की या पुस्तकातील सैफनं लिहिलेल्या भागामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. जिथं पहिल्या मुलाच्या वेळी आपण सरोगसीचा पर्यायही विचारात घ्यावा असं तिच्या डोक्यात आलं होतं. ज्यानंतर तिला जाणीव झाली की जीवनात प्रत्येक गोष्ट ही 100 टक्केच असायला हवी. तेव्हाच तिनं मनाशी एक निश्चय केला. 

असा दिसतो करीनाचा लहान मुलगा; नावाचा वाद सुरु असतानाच Finally समोर आली पहिली झलक

करीनाला आपण डेट करत होतो, त्यावेळी ती झिरो फिगर होती. किंबहुना ती लहान मुलंच्याच दुकानातून खरेदी करायची, कारण तिथंच तिला साजेचे कपडे मिळत होते असं सैफने या पुस्तकात म्हटलं आहे. गरोदरपणाचा शरीरावरही थेट परिणाम होणार होता, पण तिनं निश्चय केला आणि पाऊल उचललं असं त्यानं करीनाबद्दल लिहिलं आहे. 

2016 मध्ये करीनानं तैमूर या पहिल्या मुलाला जन्म दिला. ज्यानंतर हल्लीच 2021 मध्ये तिनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला. जहांगीर असं नाव देत सैफिनानं त्यांच्या मुलाला नवी ओळख दिली.