हॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात रंगली 'ही' बॉलिवूडची सौंदर्यवती

बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीच्या अफेयर्स आणि घटस्फोटाच्या नेहमीच चर्चा होत असतात.

Updated: Jun 6, 2022, 01:51 PM IST
हॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात रंगली 'ही' बॉलिवूडची सौंदर्यवती  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीच्या अफेयर्स आणि घटस्फोटाच्या नेहमीच चर्चा होत असतात.आता बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीच्या अफेयर्सची चर्चा सुरु झाली आहे. या अभिनेत्रीचा घटस्फोट झाला असून ती आता हॉलिवूड अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली आहे. या नात्याबाबत नुकतचं त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 

 ज्या अ‍ॅक्टर्सची चर्चा सूरू आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अ‍ॅमी जॅक्सन हॉलिवूड अभिनेता एड वेस्टविकला रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. त्यामुळे दोघांमध्ये नेमकं काय चाललय अस सवाल चाहते विचारत होते. त्यात आता अ‍ॅमीने नुकतंच बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत नात्याची कबूल दिली आहे. एड वेस्टविकनेही या नात्याला होकार दिलाय. 

दरम्यान अ‍ॅमी जॅक्सन आणि एड वेस्टविकने त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून अनेक जण त्यांचे अभिनंदन करत आहेत.

अ‍ॅमीचं पहिलं लग्न 

अ‍ॅमी जॅक्सनने याआधी जॉर्ज पनायिओटौशी 2019 मध्ये लग्न केले होते. त्याचवर्षी या जोडप्याने मुलगा एंड्रियालाही जन्म दिला होता. पण गेल्या वर्षी जॉर्ज आणि अ‍ॅमी वेगळे झाले होते. अ‍ॅमीने इंस्टाग्रामवरून जॉर्जची सर्व छायाचित्रे हटवली. 

करिअर 
अ‍ॅमी जॅक्सनने २०१० मध्ये 'मद्रासपट्टिनम' या तमिळ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर अ‍ॅमीने अनेक तमिळ, हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. तमिळ आणि इंग्रजी चित्रपटांव्यतिरिक्त अ‍ॅमीने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. अ‍ॅमी जॅक्सनने शेवटची रजनीकांत यांच्या 'रोबोट' चित्रपटाच्या सिक्वेल 2.0 मध्ये दिसली होती. त्याचवेळी एड वेस्टविकने 'गॉसिप गर्ल' या हॉलिवूडपटातून खूप प्रसिद्धी मिळवली होती.