अनुष्कासाठी विराटनेही केला करवा चौथचा उपवास

पाहा त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण 

Updated: Oct 17, 2019, 11:56 PM IST
अनुष्कासाठी विराटनेही केला करवा चौथचा उपवास title=

मुंबई : क्रिकेट आणि कलाविश्व, विशेष म्हणजे बॉलिवूडचं नातं हे काही नवं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या नात्यात अनेक सुरेख अशा जोड्यांची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. सध्या याच वर्तुळात चर्चा सुरु आहे ती म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय जोडीची. करवा चौथच्या दिवसा निमित्त या दोघांनीही एकमेकांसाठी उपवास ठेवत नात्याची एक वेगळीच बाजू सर्वांसमोर ठेवली आहे. ही जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. 

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहलीने त्याची पत्नी म्हणजेच आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासाठी चक्क करवा चौथचा उपवास केला. उत्तर भारतीय कुटुंब आणि एकंदरच संस्कृतीमध्ये करवा चौथचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'विरुष्का'च्या नात्याची ही बाजू पाहताना याचा प्रत्यय येत आहे. 

पती- पत्नीच्या या नात्यात प्रत्येक पावलावर एकमेकांची साथ देण्याती वचवं विवाहबद्ध होताना दिली जातात. त्याच वचनांचं पालन ही स्टार जोडी करत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने विराट आणि अनुष्का या दोघांनीही उपवास सोडल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघंही पारंपरिक वेशात दिसत आहेत. तर, फोटो लक्ष देऊन पाहिल्यास त्यात खऱ्या अर्थाने चार 'चाँद' लागल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

'उपवास एकत्र करतात ते एकत्रितपणे आनंदीही असतात', असं कॅप्शन देत विराटने एक फोटो शेअर केला आहे. तर, त्याने आपल्यासाठी उपवास केल्याची बाब अनुष्कानेही न विसरता नमूद केली. यावेळी लाल रंगाच्या फ्लॉरल प्रिंटच्या साडीमध्ये अनुष्का अतिशय सुंदर दिसत आहे. तर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये विराटही तिला अगदी शोभून दिसत आहे.