दीपिका-रणवीरच्या लग्नाविषयीची महत्त्वाची माहिती उघड

सध्या संपूर्ण हिंदी कलाविश्वच एखाद्या लग्नघराप्रमाणे वाटत आहे.

Updated: Oct 24, 2018, 01:58 PM IST
दीपिका-रणवीरच्या लग्नाविषयीची महत्त्वाची माहिती उघड  title=

मुंबई : सध्या संपूर्ण हिंदी कलाविश्वच एखाद्या लग्नघराप्रमाणे वाटत आहे. त्याला निमित्तही तसंच आहे. कारण, बी- टाऊनचे राम- लीला अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत लग्नाची तारीख जाहीर केली. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट लग्नाच्या पत्रिकाच पोस्ट करत 'दीप-वीर' या जोडीने चाहत्यांना आनंदाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. 

आता सर्वात लाडक्या कलाकारांचं लग्न म्हटल्यावर उत्साह असणारच. असाच काहीसा उत्साह सध्या भारतीय कलाविश्वात पाहायला मिळतोय. या दोन्ही कलाकारांच्या घरीसुद्धा आता लग्नाची तयारी शेवटच्या टप्प्यात पोहोचण्याची चिन्हं आहेत. 

खुद्द दीपिका  आणि रणवीरने जाहीर केल्याप्रमाणे १४ आणि १५ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 

आता तुम्ही म्हणाल लग्नासाठी दोन दिवस... का? 

लग्नसमारंभापूर्वीचे संगीत आणि मेहंदी हे कार्यक्रम पार पडल्यानंतर दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पद्धतींनी ते दोघंही सहजीवनाची शपथ घेतील. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४ तारखेला कन्नडिगा पद्धतीने त्यांलं लग्न होईल. तर, १५ तारखेला सिंधी- पंजाबी परंपरांनुसार अनंत कारजमध्ये ते विवाहबंधनात अडकतील. 

दीपिका आणि रणवीरच्या विवाहसोहळ्यात दोघांचेही कुटुंबीय वगळता इतर कोणी पाहुणे दिसणार नसले तरीही कलाविश्वातील काही खास चेहरे या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

लग्नसोहळा पार पडल्यानंतर बंगळुरू आणि मुंबई अशा दोन ठिकाणी जंगी पार्टीचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे दिवाळीच्या उत्साहासोबतच आता ओढ लागली आहे ती म्हणजे दीपिका- रणवीरच्या विवाहसोहळ्याची.