‘ही’ म्हणतेय अभिनेत्री, तनुश्रीच्या धाडसाची दाद द्यावीशी वाटते

नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तनुश्रीने सर्वांना धक्काच दिला.

Updated: Sep 30, 2018, 06:36 PM IST
‘ही’ म्हणतेय अभिनेत्री, तनुश्रीच्या धाडसाची दाद द्यावीशी वाटते  title=

मुंबई: असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला. खरंतर तनुश्रीने केलेल्या आरोपांनंतर कलाविश्वात दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी नानांची साथ दिली तर काहींनी तनुश्रीची पाठराखण केली. तिची पाठराखण करणाऱ्यांमध्ये आता अभिनेत्री कंगना रणौतच्या नावाचाही समावेश झाला आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तनुश्रीने सर्वांना धक्काच दिला. ज्याविषयी कंगनाला तिचं मत मांडण्याविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा तिने तनुश्रीने उचललेल्या पावलाची आणि तिच्या धाडसाची प्रशंसा केली.

‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कंगनाने तिचं मत मांडलं.

‘मी इथे कोणाच्या बाजूने बोलणार नाही आहे. मुळात माझा तसा हेतूही नाही. पण, तिच्यासोबत झालेल्या त्या प्रसंगाविषयी सर्वांसमोर वाच्यता करण्याच्या निर्णयायची आणि धाडसाची मी प्रशंसा करते. त्या प्रसंगाविषयी बोलणं हा तिचा (तनुश्रीचा) हक्कच आहे. तिचं वक्तव्य हे अतिशय महत्त्वाचं असून, त्यामुळे अनेकांचेच डोळे अघडले असणार यात शंका नाही’ असं ती म्हणाली.

बी- टाऊनमधील अनेकांनीच तनुश्रीची साथ दिल्याचं पाहायला मिळत असलं, तरीही काहींनी मात्र तिचे अरोप फेटाळून लावले आहेत.‘हॉर्न ओके प्लीज’चे सहायक दिग्दर्शक शायनी शेट्टी, खुद्द नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि इतर काहींनी हे आरोप धुडकावून लावले हेत.

दर दिवसाआड धुमसणाऱ्या या प्रकरणाला आता नेमकं कोणतं वळण मिळणार याकडेच आता संपूर्ण कलाविश्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.