VIDEO : अशी सुरु आहे प्रियांका- निकच्या लग्नाची तयारी

'क्वांटिको गर्ल', 'देसी गर्ल' अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नाची तारीखही आता जवळ आली आहे.  

Updated: Nov 26, 2018, 01:01 PM IST
VIDEO : अशी सुरु आहे प्रियांका- निकच्या लग्नाची तयारी  title=

मुंबई : 'क्वांटिको गर्ल', 'देसी गर्ल' अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नाची तारीखही आता जवळ आली आहे. अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत प्रियांका २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नसोहळ्याआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रियांकाने आपल्या लग्नाच्या तयारीसंबंधीचे काही फोटो पोस्ट करावेत अशी तिच्या चाहत्यांची अपेक्षा होती. 

चाहत्यांची ही अपेक्षा आतापर्यंत प्रियांकाने पूर्ण केलेली नसली तरीही दुसऱ्याच मार्गाने तिच्या लग्नाची तयारी नेमकी कशी सुरु आहे, याविषयीची माहिती मिळत आहे. 

प्रियांका आणि निक यांचा विवाहसोहळा जोधपूरला होणार असला तरीही तिच्या मुंबईच्या घरीही भलताच उत्साह पाहायला मिळत आहे. 

या जोडीचा साखरपुडा समारंभ पार पडला तेथेच प्रियांकाच्या जुहू येथील घराला सुरेख रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीला करण्यात आलेली ही सजावट पाहता बी- टाऊनमध्ये आणखी एका विवाहसोहळ्याची चर्चा होणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे. 

खुद्द प्रियांकाची आई, मधू चोप्रा या स्वत: विवाहसोहळ्यात जातीने लक्ष घालत आहेत. पाहुण्यांची उठबस, सजावट आणि इतरही बऱ्याच गोष्टीवरही त्या लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आता देसी गर्लचा हा देसी विवाहसोहळा नेमका कशा पद्धतीने पार पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.