सुशांतच्या निधनातून रिया आजही नाही सावरलीये; व्याकुळ होत म्हणाली, मला ....

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशीच जोडून सुरु झालेल्या ड्रग्ज प्रकरणीच्या चौकशीत रिया अडकली आणि ... 

Updated: Jan 21, 2022, 04:26 PM IST
सुशांतच्या निधनातून रिया आजही नाही सावरलीये; व्याकुळ होत म्हणाली, मला ....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. सुशांतचं जाणं संपूर्ण कला जगताला हादरवणारं होतं. कारकिर्दीत यशाच्या मार्गावर जाण्याऐवजी त्यानं निवडलेला हा मार्ग अनेकांना धक्का देऊन गेला. 

सुशांतला अतिशय जवळून पाहणारी, त्याची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला यानंतर बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला. (rhea chakraborty )

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशीच जोडून सुरु झालेल्या ड्रग्ज प्रकरणीच्या चौकशीत रिया अडकली आणि तिला कोठडीतही जावं लागलं. 

रिया या साऱ्यातून सावरत असतानाच आता पुन्हा एकदा ती पुरती तुटली असल्याचं कळत आहे. 

सोशल मीडियावर तिनं पोस्ट केलेला एक व्हिडीओ जणू हेच सांगत आहे. 

सुशांतच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रियानं त्याच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती आणि सुशांत जीममध्येही किती धमाल करायचे हेच पाहायला मिळत आहे. 

या दोघांच्याही चेहऱ्यावर असणारं हसू खूप काही सांगत आहे. वास्तव हेच आहे की हा व्हिडीओ आता फक्त भूतकाळ म्हणूनच राहिला आहे. 

कारण, सुशांतच्या जाण्यानं रियाच्या आयुष्यात कायमस्वरुपी पोकळी निर्माण झाली आहे. 

तुझी खूप आठवण येतेय, असं लिहित रियानं तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

तिचे हे शब्द आणि हा व्हिडीओ पाहून खरंच ती सावरत असली तरीही काही प्रसंगी मात्र ढासळतच आहे, हेच दिसून येतंय.