Sonam Kapoor Pregnancy Transformation : गरोदरपणात बदललं सोनम कपूरचं रुप, ओळखताही येणं अशक्य

काहींच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आलेली असते.   

Updated: Jun 4, 2022, 08:53 AM IST
Sonam Kapoor Pregnancy Transformation : गरोदरपणात बदललं सोनम कपूरचं रुप, ओळखताही येणं अशक्य  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Sonam Kapoor Pregnancy Weight Gain: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या गरोदरपणामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं गरोदरपणाची घोषणा केली आणि पाहता पाहता तिला शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढली. 

सध्या सोनम पती आनंद अहूजा याच्यासोबत काही खास क्षण व्यतीत करत आहे. गरोदरपणाच्या या काळात आनंदही तिची भरपूर काळजी घेताना दिसत आहे. गरोदरपणामध्ये सहसा महिलांचं वजन वाढलं, काहींच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आलेली असते. (bollywood Actress Sonam Kapoor Pregnancy Transformation)

सोनमसोबतही असंच काहीसं झालं. तिनं हल्ली पोस्ट केलेले फोटो पाहाल, तर लगेचच तुमच्या लक्षात येईल की या फोटोंमध्ये तिच्यामध्ये इतके बदल झाले आहेत जे पाहून तुम्हीही तिला ओळखू शकणार नाही. 

सोनमचा नो मेकअप लूक पाहिलात, तर तुम्ही ही कोण? असाच प्रश्न विचाराल. हल्लीच सोनमनं दिलेल्या मुलाखतीत आपल्याला गरोदरपणातील पहिले तीन महिने अतिशय कठीण गेल्याचं तिनं स्पष्ट केलं. 

खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायाम या साऱ्यावर ती भर देताना दिसत आहे. बरं, या साऱ्यामध्ये कुठे तिचा फॅशन सेन्स कमी झालेला नाही. तुम्हाला कसं वाटतंय तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन?